प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी  

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पत्र लिहिलं आहे. पत्रातून राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Supriya Sule made this demand to the Chief Minister on the eve of Republic Day .jpg
Supriya Sule made this demand to the Chief Minister on the eve of Republic Day .jpg

मुंबई :  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पत्र लिहिलं आहे. पत्रातून राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा, असं म्हणत संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

संविधानाप्रती जागरुकता निर्माण व्हावी, भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत. हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची आवश्यकता आहे, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल आहे. 

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा. संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे आवश्यक आहे, असं सरतेशेवटी त्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच आपण यावर नक्की सकारात्मक निर्णय घ्याल हा विश्वास आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, आणि खडकवासला यामधील नगरपालिका, नगरपरिषदा तसंच निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ आहेत.  अशा प्रकारचे संविधान स्तंभ राज्यभरात उभारले जावेत अशी अभिनव संकल्पणा सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com