भाजपला घालवून जे मिळवले ते या दोन मिरवणुकांत गमावले 

महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले.
 Sanjay Rathore, Dhananjay Munde .jpg
Sanjay Rathore, Dhananjay Munde .jpg

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा तर वनमंत्री संजय रोठोड यांच्यावर टिकटॅाक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे आरोप असतानाही कार्यकत्यांनी त्यांच्या भव्य मिरवणूका काढल्या आहेत. यावरुन सामाजिक कार्यकत्यांनी महाविकास आघाडी सरकारला काही सवाल केले आहेत.  

सामाजिक कार्यकत्ये हेरंब कुलकर्णी यांनी काही सवाल केले आहेत. ते म्हणतात की, 
''धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांचे भव्य स्वागत 
People get the government as they deserve हेच शेवटी जनता आणि नेत्याबाबत खरे असते का ? 
महिला धोरणाचे निर्माते शरद पवार 
सुप्रियाताई
नीलम गोऱ्हे 
यशोमती ठाकूर
आपण या दोन मिरवणुका बघताय ना .....? पुरोगामी सरकार म्हणजे फरक नेमका काय असतो...??
भाजपला घालवून जे मिळवले ते या दोन मिरवणुकात तुम्ही गमावले....आणि या घटनेपेक्षा सरकारच्या नेतृत्वाचा सन्नाटा अधिक क्लेशदायक'' असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.  

''सत्ताधारी पक्षातील मंत्री मग कोणीही असो त्याच्यावर खुनाचे, बलात्काराचे अगदी कोणतेही गंभीर आरोप झाले तरी त्यांचे अंधभक्त मात्र पाठिंबा देऊन मिरवणुका काढतात .महिला सन्मान फक्त कागदोपत्रीच. आज खूप वाईट वाटतेय हे सांगताना की हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि हा शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे'', असे सामाजिक कर्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

''राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर, सत्ताधारी आघाडीतल्या सगळ्या ताई कधी बोलणार?  का स्त्री-मुक्ती पेक्षा सत्ताच महत्वाची आहे तुमच्यासाठी''? असा प्रश्न सामाजिक कार्यकत्ये विश्वंभर चौधरी यांनी विचारला आहे. 

धनंजय मुंडे याचे बीडमध्ये जेसीबीने गुलाल व फुलांची उधळण करत स्वागत झाले, संजय राठोड यांच्या स्वागतासाठीही पोहरादेवी येथे मंगळवारी (ता. २३ फेब्रुवारी) मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यांचेही भव्य स्वागत करण्यात आले. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे संचार बंदी असतानाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच प्रकारच्या सामाजिक, धार्मीक कार्यक्रमावर बंदी घातलेली असतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या स्वागतावरुन महाविकास आघाडी सरकारवर काही प्रश्ना उपस्थित होत आहेत.   

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com