Sanjay Rathore gave Rs 5 crore to Pooja Chavan's parents .jpg
Sanjay Rathore gave Rs 5 crore to Pooja Chavan's parents .jpg

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना संजय राठोडांनी पाच कोटी दिले...

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा रविवारी (ता. २८ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा रविवारी (ता. २८ फेब्रुवारी)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. मात्र, आता या प्रकरणात पूजा चव्हाणच्या आजी शांताबाई राठोड यांनी धक्कादायक आरोप केला आहे.   

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये दिले. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे. पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासूनच आवाज उठवलेला आहे. पूजाचे आई-वडील काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई-वडिलांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी पैशापोटी स्वतःच्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडिल मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई-वडील खोटे बोलत आहेत, असा दावा शांताई राठोड यांनी केला आहे. 

पैसे घेतल्यामुळेच ते स्वतःच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत नाहीत. ते आता आयुष्याभर आमची मुलगी मानसिक ताणाखाली होती असेच सांगणार. त्यांचा आवाज कायम दबकाच राहणार. पूजाच्या आई वडिलांना पैसा मिळाला आहे. तो आता बोलत आहे. पूजाचा घात झाला. पण पैशापोटी चो दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा आरोप शांताबाई राठोड यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीदेखील त्यांनी केली. 

दरम्यान, पूजा चव्हाण यांचे आई-वडील मला येऊन भेटले. त्यांनी मला पत्र दिले असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. 28 फेब्रुवारी) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले मला पूजाच्या आई-वडिलांनी सांगितले की, ''माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकारणी संजय राठोड यांच नाव जोडले जात आहे. मात्र त्यांचा राजीनामा घेऊ नका. आम्ही ती मागणी केलेली नाही. संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये, ते समाजाचे मोठे नेते आहेत. राजकारणामुळे पूजाचा रोज बळी जातोय याबाबत राजकारण केले जात आहे'', असे ते म्हणाले होते. 

''पूजा चव्हाण यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तक्रार केली आहे. त्याबद्दल त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याशी आपला कोणताही रक्ताचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच, पूजा चव्हाण हिच्या बदनामीबद्दलही संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील'', असेही ठाकरे सांगितले होते. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com