महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गालही रंगवणार : चाकणकरांचा दरेकरांना इशारा

आपला ह्या वैचारिकतेशी दूरदूरचा कोठेही संबंध दिसत नाही.
Rupali Chakankar Gave Answer to Praveen Darekar's allegation
Rupali Chakankar Gave Answer to Praveen Darekar's allegation

पुणे : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरूरमधील सभेत जे विधान केले. त्याबद्दल दरेकर यांनी महिलांची जाहीर माफी मागावी; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगविणाराही पक्ष आहे, हेसुद्धा आपण लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना दिला. (Rupali Chakankar Gave Answer to Praveen Darekar's allegation)

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आज (ता. १३ सप्टेंबर) आयोजित केलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे विधान केले होते. त्यावरून चाकणकर यांनी दरेकर यांना वरील इशारा दिला आहे.

त्या म्हणाल्या की विधान परिषद ही ज्येष्ठ, अभ्यासू आणि वैचारिक लोकांचे सभागृह म्हणून ओळखले जाते. पण, आपण आज शिरूरमध्ये जे विधान केले, त्यावरून असं दिसतंय की आपला ह्या वैचारिकतेशी दूरदूरचा कोठेही संबंध दिसत नाही. आपण जे वाक्य उचारले, ते वाक्य उचारायला मला खरं तर लाज आणि संकोच वाटतो. आपण जर जाहीर सभेत बोलत असाल तर आम्हालाही बोलणे गरजेचे आहे. आपण बोललात की राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. या विधानातून प्रवीण दरेकर यांनी आपली वैचारिक दरिद्रता आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. 

ज्या पद्धतीने आपल्या बोलण्यातून ही घाण टपकतेय, ती भाजपची वैचारिक बैठक आणि संस्कृती आहे. महिलांना दुय्यम लेखणे, हा तुम्ही पाडलेला पायंडा आहे. तुमच्या पक्षातील महिला बाहेर फिरताना सांगतात की ‘आम्ही महिलांच्या कैवारी आहोत,’ त्यांनीही दरेकर यांच्या विधानाचा विचार करावा, असा टोला चाकणकर यांनी नाव न घेता चित्रा वाघ यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर?

गरिबांना, छोट्या कार्यकर्त्यांना न्याय, ताकद आणि सत्ता देण्याचे काम भारतीय जनता पक्षच करू शकतो. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे बघायला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. तो सुभेदार, साखर कारखानदार, बँकवाले, उद्योगपतींचा पक्ष आहे. भाजप मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे विधान प्रवीण दरेकर यांनी शिरूरमध्ये बोलताना केले होते. 

ते म्हणाले की राज्यातील रामोशी बांधवांसह बहुजन समाजाने, महाविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार पेटवावा. भारतीय जनता पक्ष या विद्रोहाच्या बळावर या नाकर्त्या लोकांची सत्ता उलथवून टाकेल. आमच्या हातात कमळ आहे, म्हणून आम्हाला कमजोर समजणारांनी आता हे ध्यानात घ्यावे की आमच्या दुसऱ्या हातात राजे उमाजी नाईक यांची कुऱ्हाड आहे. त्यातून आम्ही अन्यायी राजवटीवर घाव घालणारच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com