पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकावर आदित्य ठाकरे म्हणतात... हे तर व्हिटॅमिन!

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Prime Minister Modis compliment is a vitamin says Aditya Thackeray
Prime Minister Modis compliment is a vitamin says Aditya Thackeray

पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. त्यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला टोला लगावला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आज पंतप्रधानांच्या कौतुकावर भाष्य केलं. (Prime Minister Modis compliment is a vitamin says Aditya Thackeray)

कात्रज येथील कै.ताराबाई हनुमंत थोरवे लाइफ केअर हॅास्पिटलच्या कोविड केअर सेंटरचे अॅानलाइन उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. शिवेसनेचे खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा, सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेली बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात जनतेसाठी दिवस-रात्र काम केले तरी वेळ खूप अपुरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला ज्या पध्दतीने महाराष्ट्र सामोरा गेला, त्याचे कौतुक सर्वोच्च न्यायालय अन् पंतप्रधानांनीही केलं आहे. हे कौतुक म्हणजे आपल्यासाठी व्हिटॅमिन आहे. हे व्हिटॅमिन घेऊन आणखी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या योग्य निर्णयांमुळे ही साथ आटोक्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहेत. असा अभ्यास इतर मुख्यमंत्र्यांनी केला असता तर त्या राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. सर्वोच्च न्यायालयाने निर्माण केलेला टास्क महाराष्ट्राने गेल्या वर्षभरापासून राबवला. त्यामुळे महाराष्ट्राचे जगभर कौतुक होत आहे.

दरम्यान, कोविड केअर सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड, ७० आयसोलेशन बेड, १ व्हेंटिलेटर अशी व्यवस्था आहे.  हे ४ मजली कोविड केअर सेंटर आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, अॅड. संभाजी थोरवे, कल्पना थोरवे, हरिश अगरवाल यांच्या पुढाकारातून हे सेंटर साकारले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com