जे दिशा बरोबर झाले..तेच पूजा बरोबर होणार असेल, तर... - Pooja Chavan over suicide Nitesh Rane criticism of the state government | Politics Marathi News - Sarkarnama

जे दिशा बरोबर झाले..तेच पूजा बरोबर होणार असेल, तर...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

पुण्यामध्ये पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करण्यात येत आहेत.

मुंबई : पुण्यामध्ये पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करण्यात येत आहेत. त्यावरुन विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी नीतेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येवरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर नीतेश राणेंनी ट्विट करुन या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ''जे दिशाबारोबर झाले तेच पूजाबारोबर होणार असले, तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही''? असे ट्विट करत त्यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. 

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला असून तिचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच तिच्या मृत्यूबाबत सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आँडिओ क्लिप पोलिसांनाही मिळाल्या आहेत. त्यातील बऱ्याच क्लिप या बंजारा बोलीत असल्याने त्याच्या भाषांतराचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. 

पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने रविवारी (ता. आठ फेब्रुवारी) तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा हि तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. मूळ परळी वैजनाथ येथील असलेली पूजा ही स्पोकन इंग्रजीच्या क्लाससाठी पुण्यात महिनाभरापूर्वी आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती गॅलरीतून पडली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली.

पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण... तिनं दारु पिली की तिला पाजण्यात आली...? 

तिचा भाऊ विलास चव्हाण व अरूण राठोड यांनी तिला तेव्हा तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या दाव्यानुसार तिच्या आईवडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र, ती काही गंभीर आजाराने त्रस्त असल्याने तिने उडी मारली असावी, असा पोलिसांना जबाब देण्यात आला. सुरवातीपासून तिची आत्महत्या म्हणून सर्वत्र चर्चा आहे. पण पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या आत्महत्या म्हणून शिक्कामोर्तब केलेले नाही आणि ते प्रकरण बंदही केलेले नाही. 

पूजा चव्हाणची आत्महत्याच की....? पोलिस त्या 'दोघांचे' पुन्हा जबाब घेणार 
 

पूजाच्या आई-विडीलांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. मात्र ती सोरायसीस या आजाराने त्रस्त असल्याने तिने आत्महत्याचे पाऊल उचलले असावे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ट्रीटमेंट करण्याबाबत संबंधित मंत्री आणि राठोड यांच्यात संवाद आहे. ते  नेमके कुठल्या ट्रिटमेंटबद्दल चर्चा झाली, याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. आज व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषण आहेत. तो आवाज संबंधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल. ही ऑडिओ क्लिप पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का, याची तपासणी होईलच. पण तोपर्यंत  या 22 वर्षाच्या पूजाने आत्महत्या का केली असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 पूजा  चव्हाणचा मोबाईल आणि लॅपटॅाप पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख