Police's performance is proud, your vision has changed, Chakankar's criticism of Amrita Fadnavis | Sarkarnama

पोलिसांची कामगिरी अभिमानास्पदच, बदलली आहे तुमची दृष्टी, अमृता फडणविसांवर चाकणकरांची टीका

महेश जगताप 
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अमृता फडणवीस यांच्या ट्‌विटला चाकणकर यांनी उत्तर दिले आहे.

पुणे : अमृताजी,देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना हेच पोलीस बांधव सेवा देत होते आणि आजही तेच सेवा बजावत आहेत. पोलीस बांधव तेच आहेत,ब्रीद तेच आहे आणि कामगिरीही अभिमानास्पद आहे.

बदललीय ती फक्त तुमची दृष्टी.असा टोला रुपाली चाकणकर यांनी सुशांत राजपूत सिंह यांच्या प्रकरणावर अमृता फडवणीस यांनी मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्यावर टोला लगावला आहे . 

अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं होते त्यावरून फडवणीस यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही असं ट्विट केलं होत. 

त्याचबरोबर ..रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं ! 
मगर हम तो वो शक़्स हैं, जो पत्थरों से घर बनाया करते हैं ! 
भूल गए हैं वो कांच के घरो में रहकर ख़ुद, छुपाएं कुछ छुपता नहीं ! ! 
हम फरेबियोंको ठोकरों में,और सच को सीने से लगाया करते हैं ! 
! हा शेरही ट्विटरवर त्यांनी टाकला होता 

अमृता फडणवीस यांच्या ट्‌विटला चाकणकर यांनी उत्तर दिले आहे. सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही वर्षा बंगला सोडतानाही पाहिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या पोलीस बांधवांवर आपण अविश्वास दाखवत आहात त्यांनी बॉम्बस्फोट,पूर,हल्ला आणि आताच्या कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. असे उत्तर दिले आहे. 

चाकणकर यांच्याप्रमाणे अभिनेत्री किशोरी शहाणे यांनीही अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्यानीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मुंबई हा महाराष्ट्रा आत्मा आहे. ती मुंबईची राजधानी आहे. मराठी माणसाची मुंबई आहे याकडे लक्ष वेधत नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख