Neelam Gorhe helps Mumbai's Dabewala | Sarkarnama

आमदार नीलम गोऱ्हे धावल्या डबेवाल्यांच्या मदतीला 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 जून 2020

कोरोनाच्या विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. दिवसभर काम करावे, त्या वेळी दोन वेळचे जेवण मिळते, अशा हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे मोठे हाल झाले. याच लॉकडाउनमुळे मुंबईचा डबेवालाही आर्थिकदृष्ट्या अडचणी आला होता. 

मुंबई : कोरोनाच्या विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. दिवसभर काम करावे, त्या वेळी दोन वेळचे जेवण मिळते, अशा हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे मोठे हाल झाले. याच लॉकडाउनमुळे मुंबईचा डबेवालाही आर्थिकदृष्ट्या अडचणी आला होता. 

संपूर्ण मुंबई आणि कार्यालये बंद असल्याने डबेवाल्यांचे हक्काचे काम ठप्प झाले होते. डबे पोचवून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर त्यांचे घर चालायचे. पण, लॉकडाउनमुळे रोजगार बंद झाल्याने डबेवाल्यांची परिस्थिती बिकट बनली होती. काही डबेवाल्यांच्या घरी खायला अन्नही नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

अशा वेळी शिवसेना नेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे या डबेवाल्यांच्या मदतीला धावून गेल्या आहेत. "ऍक्‍शन ऍड'च्या निरजा भटनागर यांच्या मार्फत आज (ता. 20) अंधेरी, दहिसर, बोरिवली येथील डबेवाल्यांना रेशनच्या किटचे वाटप करण्यात आले. नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून धान्य उपलब्ध झाल्याने डबेवाल्यांच्या कुटुंबीयांना काही दिवसांसाठी तरी आधार मिळालेला आहे. 

आमदार नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आणि नीरजा भटनागर यांच्या सहकार्याने मुंबईतील डबेवाल्यांना रेशनिंगचे धान्य मिळाले आहे. मुंबई डबेवाला असोसिएशन त्यांचे आभारी आहे, अशा शब्दांत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त ससूनला पाच लाखांचा निधी 

पुणे : कोविड- 19 च्या आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील सरकारी व महापालिकेची हॉस्पिटले अहोरात्र काम करत आहेत. बे. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी आमदार निधीतून काही वैद्यकीय साहित्य देण्याची मागणी शिवसेना प्रवक्‍त्या तथा विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. 

त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वर्धापनदिनामित्त स्थानिक आमदार विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत निधीतून कोविड-19 वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी रक्कम देण्याचा निर्णय आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला. बे. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांना एकूण पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. 

या निधीतून पीपीई किट घेण्यासाठी तीन लाख रुपये आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एन-95 मास्क, ग्लोव्हज खरेदीसाठी दोन लाख रुपये देण्यात आले आहेत. तशी सूचना त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना दिली आहे. हा निधी दिल्याबाबत डॉ. तांबे यांनी आमदार नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख