खासगी प्रयोगशाळेतच पॉझिटिव्ह रिपोर्टस जास्त 

राज्यात आतापर्यंत 44,8661 इतक्‍या कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातील 24,1089 चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये, तर 20,7572 चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या आहेत.
खासगी प्रयोगशाळेतच पॉझिटिव्ह रिपोर्टस जास्त 

मुंबई : राज्यात सध्या सरकारी, तसेच खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. खासगी प्रयोगशाळांपेक्षा सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचण्या अधिक झाल्या असल्या तरी खासगी प्रयोगशाळांमधील पॉझिटिव्ह रिपोर्टस 4 टक्‍क्‍यांनी अधिक असल्याचे सरकारने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

 
राज्यात आतापर्यंत 44,8661 इतक्‍या कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातील 24,1089 चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये, तर 20,7572 चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या आहेत. सरकारी प्रयोगशाळांमधील 86.93 टक्के म्हणजेच 20,9567 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत;

तर खासगी प्रयोगशाळांमधील 82.31 टक्के म्हणजेच 17,0858 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रयोगशाळा मिळून 84.79 टक्के म्हणजेच 38,0425 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
 
दोन्ही प्रयोगशाळांमधील 15.21 टक्के म्हणजेच 68,236 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यात सरकारी प्रयोगशाळांमधील 13.7 टक्के म्हणजेच 31,522, तर खासगी प्रयोगशाळांमधील 17.69 टक्के म्हणजेच 36,714 चाचण्यांचा समावेश आहे. सरकारी प्रयोगशाळांपेक्षा खासगी प्रयोगशाळांमधील पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण हे 4.62 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. 

खासगी प्रयोगशाळांकडील कल वाढला 
राज्यात आतापर्यंत 73 सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यात आल्या, तर काही ठराविक 4 खासगी प्रयोगशाळांना चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी अधिक ताण असल्याने अहवाल यायला उशीर होतोय. 

 कोरोना नियंत्रणासाठी 171 कोटींचा निधी 

कोरोना नियंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या निर्णयानुसार आतापर्यंत 171 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

आता पुन्हा विभागीय आयुक्तांमार्फत 16 जिल्ह्यांना 39 कोटी 56 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

वडेट्टीवार यांनी निधीसंदर्भात कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी राज्यातील विभागीय आयुक्तांमार्फत सोळा जिल्ह्यांना 39 कोटी 56 लाख रुपयांचा निधी 29 मेच्या निर्णयानुसार वितरित करण्यात आला असल्याची माहितीही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com