As Jagdish Mulik says, will the Chief Minister give Rs 500 crore to Pune? | Sarkarnama

जगदीश मुळीक म्हणतात तसे मुख्यमंत्री पुण्याला पाचशे कोटी देतील का ? 

उमेश घोंगडे 
गुरुवार, 30 जुलै 2020

पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाचशे कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

पुणे : कोरोना संकटाच्या तब्बल साडेचार महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे भेटीवर आले आहेत. विभागीय आढावा बैठक घेण्यासाठी ते पुण्यात आले असून संकटात सापडलेल्या पुण्याला मुख्यमंत्री काय मदत करतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाचशे कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. त्यामुळे पुण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे काय मदत जाहीर करतात याबाबत उत्सुकता आहे. 

नाशिक, अलिबाग व आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरचा अपवाद वगळता गेल्या साडेचार महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे मुंबई बाहेर पडले नाहीत. राज्यात कारोनाचे संकट असताना मुख्यमंत्र्यांनी किमान विभागीय पातळीवर बैठका घेऊन कोरोना संकटाचा आढावा घ्यावा अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी मुबंई बाहेर जाण्याचे टाळले होते. या संदर्भात चर्चा होऊ लागल्यानंतर पुण्यातील आजची आढावा बैठक होत असून पुढील काही दिवसात इतर विभागातदेखील भेट देऊन मुख्यमंत्री आढावा घेतील अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

पुण्यात कोरोनाच्या ×क्‍टीव्ह रूग्णांची संख्या जवळपास हजार झाली आहे. रोज ही संख्या वाढत आहे. गेल्या साडेचार महिन्यात जवळपास अडीच लाख रूग्णांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरीकांची संख्यादेखील मोठी आहे. गेल्या चार महिन्यात कोरोनाचा अटकाव करणयासाठक्ष पुणे महापलिकेते सुमारे अडीचशे कोटी रूपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे.

 या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणेकरांसाठी किमान पाचशे कोटी रूपये मदत म्हणून द्यावेत, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. अनेक प्रयत्नांनंतरदेखील पुण्यातील कोरोनाची स्थिती आटोक्‍यात येत नाही. त्यामुळे पुण्यात आणखी कोवीड रूग्णालये तसेच इतर सुविधा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या निधीची गरज असून राज्य सरकारने यासाठी मदत करावी, ही मागणी गेल्या तीन महिन्यात भाजपाकडून सातत्याने करण्यात आली आहे.महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या या मागणीला मुख्यमंत्री ठाकरे काय प्रतिसाद देतात हे काही तासातच स्पष्ट होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख