Harshvardhan Patil is in BJP, he should not worry about Congress now, advises Thorat | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आहेत त्यांनी आता कॉंग्रेसची काळजी करू नये, थोरातांचा सल्ला 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 जुलै 2020

थोरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या विषयी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, की श्रीराम हे दैवत आहेत. पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तर रामाचे दर्शन घ्यायला जाऊ.

मुंबई : कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन इतरांचे दुर्लक्ष व्हावे, म्हणूनच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जात आहे, तसेच राम मंदिर हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या श्रद्धेचा विषय असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 

थोरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या विषयी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, की श्रीराम हे दैवत आहेत. पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तर रामाचे दर्शन घ्यायला जाऊ. आता माणसे जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन दुर्लक्ष करण्यासाठीच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जात आहे.. 

थोरात यांनी यावेळी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. पाटील आता भाजपमध्ये आहेत त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसची काळजी करू नये, असे म्हटले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला होता. 

दरम्यान, राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेले ते विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नसून श्रीरामाच्या विरोधातील आहे अशी टीका भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आज केली आहे. 

कोरोनामध्ये सापडलेल्या लोकांना बाहेर कसे काढायचे याचा विचार आम्ही करीत आहोत. याला आमचे प्राधान्य आहे. त्या कामाला आम्ही प्राधान्य देत आहोत. काही लोकांना वाटत असेल, मंदिर बांधून कोरोना जाईल. अशी त्यांची भावना असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरात लगावला होता. 

शरद पवार हे कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारचे प्राधान्यक्रम कोणते असावेत यावर भाष्य केले. कोरोना संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न आवश्‍यक असल्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले की, कोणत्या गोष्टीला प्राधान्य आणि महत्व द्यायचे याचा विचार ज्याचा त्याने करावा. कोरोनामध्ये सापडलेल्या लोकांना बाहेर कसे काढायचे याचा विचार आम्ही करीत आहोत. याला आमचे प्राधान्य असल्याचे म्हटले होते. तसेच शिवसेनेचे नेतेही या मुद्यावर भाष्य करीत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख