धवलसिंहांनी बिबट्याला घाबरवले, भाजपलाही घाबरवतील ! - Dhavalsingh killed Leoperd now he will fight with BJP Also | Politics Marathi News - Sarkarnama

धवलसिंहांनी बिबट्याला घाबरवले, भाजपलाही घाबरवतील !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

नुकतीच त्यांनी बिबट्याची शिकार केली होती. त्यामुळे बिबट्याला घाबरवणारे धवलसिंह आगामी काळत सोलापूरमध्ये भाजपलाही घाबरवून सोडतील अशी प्रतिक्रीया कॅांग्रेस नेत्यांनी यावेळी व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांनी उत्साहात टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले.

मुंबई : सोलापूरच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या मोहिते- पाटील घराण्यातील डॅा. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज वाजत गाजत कॅाग्रेस पक्षात प्रेवश केला. नुकतीच त्यांनी बिबट्याची शिकार केली होती. त्यामुळे बिबट्याला घाबरवणारे धवलसिंह आगामी काळात सोलापूरमध्ये भाजपलाही घाबरवून सोडतील अशी प्रतिक्रीया कॅांग्रेस नेत्यांनी यावेळी व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांनी उत्साहात टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले. 

डॅा. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या समर्थकांसह मुंबईत टिळक भवन कार्यालयात कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी साडे सहाशे कार्यकर्त्यांनी कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख, सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांसह मोठ्या संख्येने विविध नेते उपस्थित होते. 

यावेळी धवलसिंह यांचे स्वागत करताना आमदार देशमुख म्हणाले, त्यांनी नीडरपणे बिबट्याचा सामना केला. आगामी काऴात भाजपचा मुकाबला करण्यासाठी ते तेव्हढ्याच क्षमतेने आघाडीवर राहतील. त्यासाठी त्यांना सगळ्यांचे बळ मिळले. कॅांग्रेस पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहतील. 

आमदार देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील घराण्याचे सर्वच बाबतीत मोठे स्थान आहे. शंकरराव मोहिते पाटील यांनी साखर कारखाना, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात विकासाची मुहुर्तमेढ रोवली. हे करताना त्यांनी कॅांग्रेसचा विचार घेऊन त्यांनी वाटचाल केली. कॅांग्रेसच्या विचाराशी जुळेलेले ते नेते होते. आज त्यांच्याच घराण्यातील प्रतिनिधी पुन्हा त्याच कॅांग्रेसच्या विचाराशी जोडला जात आहे. ही सोन्याची संधी आहे. (कै) विलासराव देशमुख नेहेमी म्हणायचे कॅांग्रेस पक्ष हा विचार आहे. तो विचाराने चालतो. त्याला संपवायला अनेकांनी प्रय्तन केले. मात्र कॅांग्रेसला संपवणारे संपले. मात्र ते कॅांग्रेस पक्ष संपवु शकले नाहीत. 

डॅा धवलसिंह हे संघटन कैशल्य, कार्यकर्ते सांभाळणारे व जनतेशी नाळ जोडलेले आहेत. त्यामुळेच सोलापूरच्या ग्रामीण बागात त्यांनी मोठे कामकेले आहे. फक्त एव्हढेच नाही तर तर त्यांना भविष्याचा वेध घेता येतो. त्यामुळेच त्यांना भविष्यात कोणाला संधी आहे, याचा विचार करुन कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी नुकतेच बिबट्याला मारले. हा बिबट्या साधासुधा नव्हता. त्याने चार जिल्ह्यांत दहशत पसरवली होती. या बिबट्यासमोर ते धाडसाने उभे राहिले आणि त्याला संपवले. बिबट्याला मारणारा हा सिंह आता कॅांग्रेस पक्षात आला आहे. तो बाजपला निश्चितच घाबरवून सोडेल.
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख