#Corona पुणेकरांनो स्थिती गंभीर आहे; काल तब्बल ४६० रुग्ण सापडलेत

रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ५० टक्क्यांच्या आसपास असतानाच पुण्यात मात्र स्थिती फारशी चांगली नाही. पुण्यात काल एकाच दिवसात विक्रमी ४६० रुग्णांची नोंद झाली तर १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Coroan Situation in Pune not good
Coroan Situation in Pune not good

मुंबई : पुण्यात कोराेनाची स्थिती फारशी चांगली नाही. पुण्यात काल एकाच दिवसात विक्रमी ४६० रुग्णांची नोंद झाली तर १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात काल १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५९ हजार १६६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ५० टक्क्यांच्या आसपास असतानाच
 

दरम्यान, काल कोरोनाच्या ३३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी दिली आहे. पुण्यात २३२ रुग्णांची स्थिती गंभीर असून ४४ जण व्हेंटिलेटरवर आहेत.

त्यांनी दिलेल्या माहतीनुसार सध्या ५५ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण ९८ प्रयोगशाळा करोना निदानासाठी काम करत आहेत. ७ लाख ९५४  नमुन्यांपैकी  १ लाख १६ हजार  ७५२ नमुने पॉझिटिव्ह (१६.६५ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८२ हजार  ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ११४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७८ (मुंबई ७७, मीरा भाईंदर १), नाशिक- ११(जळगाव ७, नंदूरबार २, मालेगाव २), पुणे- २२ (पुणे ३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड १), लातूर-२ (लातूर २), अकोला-१ (यवतमाळ १).

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८८ पुरुष तर २६ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७६ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहेत. या ११४ रुग्णांपैकी ८४ जणांमध्ये (७३.७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५६५१ झाली आहे. 

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (६१,५८७), बरे झालेले रुग्ण- (३१,३३८), मृत्यू- (३२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,९९७)
ठाणे: बाधीत रुग्ण- (२०,१६७), बरे झालेले रुग्ण- (८५९१), मृत्यू- (६४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,९३३)
पालघर: बाधीत रुग्ण- (२६९१), बरे झालेले रुग्ण- (९२२), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६८७)
रायगड: बाधीत रुग्ण- (२०६७), बरे झालेले रुग्ण- (१३२०), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५९)
रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (३०७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१५८), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
पुणे: बाधीत रुग्ण- (१३,२५०), बरे झालेले रुग्ण- (७४१०), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२३०)
सातारा:  बाधीत रुग्ण- (७८३), बरे झालेले रुग्ण- (४९१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७)
सांगली: बाधीत रुग्ण- (२६७), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (६१५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१९९०), बरे झालेले रुग्ण- (७०२), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०४)
नाशिक: बाधीत रुग्ण- (२१८८), बरे झालेले रुग्ण- (१३१४), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४०)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
जळगाव: बाधीत रुग्ण- (१९३६), बरे झालेले रुग्ण- (८८०), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८०)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)
धुळे: बाधीत रुग्ण- (४६४), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२९६०), बरे झालेले रुग्ण- (१६५४), मृत्यू- (१६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३८)
जालना: बाधीत रुग्ण- (३१४), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८)
बीड: बाधीत रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
लातूर: बाधीत रुग्ण- (१९८), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
परभणी: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
नांदेड: बाधीत रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण (१६४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
अमरावती: बाधीत रुग्ण- (३८५), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)
अकोला: बाधीत रुग्ण- (१०९९), बरे झालेले रुग्ण- (६३४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०८)
वाशिम: बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२०५), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१)
नागपूर: बाधीत रुग्ण- (११२९), बरे झालेले रुग्ण- (६४७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७०)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
भंडारा: बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१००), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८)
एकूण: बाधीत रुग्ण-(१,१६,७५२), बरे झालेले रुग्ण- (५९,१६६), 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com