मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम नजरेत भरणारे : आढळराव पाटील

आढळराव पाटील म्हणाले, "" इतर तालुक्‍याच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात आंबेगाव तालुक्‍यातील प्रशासनाने चांगले काम केलेआहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम नजरेत भरणारे : आढळराव पाटील

मंचर (जि.पुणे) : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रंदिवस करत असलेले काम नजरेत भरणारे आहे. ते मोजकेच बोलतात पण त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे.सरकार व प्रशासनात उत्कृष्ठ समन्वय आहे.त्यामुळे कोरोना हद्दपार होऊन राज्याचे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर लवकरच येईल.असा विश्वास शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. 

लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत कोरोनाची प्राथमिक रॅपिड अँटीबॉडी टेस्ट,उलेखनीय काम केल्याबद्दल कोविड कवच योद्धा पुरस्कार,वितरण,अडीच हजारगरीब कुटुंबाना जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट वाटप व रक्तदान शिबीरकार्यक्रमात पाटील बोलत होते. 

यावेळी भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पना आढळराव पाटील,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर,जिल्हा प्रमुख माऊली कटके, पुणे जिल्हा परिषद शिवसेना गटनेते देविदास दरेकर उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले,तालुका प्रमुख अरुण गिरे,पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले,शिवसेना नेते रवींद्र करंजखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, ग्राहक संरक्षण कक्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव राजगुरू उपस्थितीत होते. 

आढळराव पाटील म्हणाले, "" इतर तालुक्‍याच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात आंबेगाव तालुक्‍यातील प्रशासनाने चांगले काम केले 
आहे. त्यांमध्ये आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका,रुग्णवाहिका चालक यांनीही जीव धोक्‍यात घालून इतरांचे जीव वाचविण्यासाठी केलीली मेहनत कौतुकास्पद आहे. जनतेने त्यांना सहकार्य करावे. 

कोविड कवच योद्धा पुरस्कार विजेते : तहसीलदार रमा जोशी,पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे,अर्पणा पाटील,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे,डॉ.संग्रामसिह बावचकर ,सरपंचदत्ता गांजाळे, प्रीती थोरात,अनिता आढारी, अंकुश लांडे,अनिल डोके, पोलीस पाटील बबुशा वाघ, विठ्ठल वळसे पाटील, अंगणवाडी सेविका : शालन सोनवणे,सुरेखा देणे, जयश्री करपे 

आरोग्य सेविका : सुषमा उंडे ,वंदना धादवड,नम्रता शिंदे रुग्णवाहिका चालक : अमित काटे ,गौरव बारणे, गणेश काळे, आदींचा गौरव करण्यात आला.यावेळी अनेकांनी रक्तदान केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com