भाजपच्या आणखी एका नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

प्रदीप खोपडे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून काम केले आहे.
BJP leader Pradip Khopde enters Shiv Sena from Bhor
BJP leader Pradip Khopde enters Shiv Sena from Bhor

नसरापूर (जि. पुणे) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे भोर तालुक्‍यातील नेते प्रदीप खोपडे यांनी मुंबईत शिवसेना भवन येथे पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

दरम्यान, प्रदीप खोपडे हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र त्यांचे मन त्या ठिकाणी न रमल्याने त्यांनी अवघ्या चार वर्षांतच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रदीप खोपडे यांचे पश्‍चिम महाराष्ट्र सहकार क्षेत्रात चांगले काम असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी सभापती आणि विद्यमान संचालक आहेत. मागील चार वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होते. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या प्रश्नाबाबत शिवसेना पक्षाकडूनच मार्ग निघू शकेल, याचा विश्वास वाटल्याने त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता आणि शक्ती प्रदर्शन न करता 30 कार्यकर्त्यांसह साध्या पद्धतीने शिवसेनेत प्रवेश केला. 

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता. 2 मार्च) मुंबई दादर येथील शिवसेना भवनात पक्षाचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी त्यांचे शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले. या वेळी शिवसेना उपनेते विभागीय समन्वयक माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान उभे, भोर तालुक्‍यातील शिवसेना उपतालुकाप्रमुख हनुमंत कंक, विभाग प्रमुख विजूकाका जेधे आदी उपस्थित होते. 

प्रवेशानंतर माहिती देताना प्रदिप खोपडे यांनी सांगितले की, मला सहकार क्षेत्रातील माहिती असून याच क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. सहकारातील प्रश्नाबाबत शिवसेना पक्ष योग्य न्याय देऊ शकतो, याची खात्री पटल्याने सर्व सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रथम काही निवडक कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची धेय्य धोरणे लक्षात घेऊन सहकारात पक्षाचे बळ वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com