सुप्रियाताई, अजितदादा, 'आमच्या मुलांना भारतात परत आणा हो...' 

रशियातील कझान या प्रांतातील विविध महाविद्यालयांत अडकून पडलेल्या 250 विद्यार्थ्यांना भारतात परत आणावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. या बाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलत या विद्यार्थ्यांना मुंबईत आणावे असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.
Appeal to Supriya Sule, Ajit Pawar, parents of students stranded in Russia
Appeal to Supriya Sule, Ajit Pawar, parents of students stranded in Russia

बारामती  : रशियातील कझान या प्रांतातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत अडकून पडलेल्या 250 विद्यार्थ्यांना भारतात परत आणावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. या बाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलत या विद्यार्थ्यांना मुंबईत आणावे असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्रातील विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील 250 विद्यार्थी रशियाच्या कझान प्रांतातील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे या विद्यार्थ्यांना घराची ओढ लागून राहिली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प असल्याने या विद्यार्थ्यांना परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात लक्ष घालून या मुलांना तातडीने महाराष्ट्रात मुंबईत परत आणावे, अशी मागणी होत आहे. रशियातील मुले आता व्याकूळ झाली असून अनेकांना निराशेने ग्रासले असल्याचे पालकांनी सांगितले. या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. 

बारामतीचे पालक नरेंद्र पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातील दोन मुले रशियात आहेत. त्यांना परतण्यासाठी विमानाचे तिकीट 50 हजार रुपये, तर भारतात परतल्यावर दिल्ली येथे सशुल्क विलगीकरण कक्षामध्ये 14 दिवस वास्तव्यासाठी प्रत्येकी 49 हजार रुपये आकारले जातील, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. मुलांची विलगीकरण कक्षात राहण्याची तयारी आहे; पण हा कक्ष दिल्लीऐवजी मुंबईत असावा, अशी सर्वांची मागणी आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून या काळात एक लाखांचा खर्च करणे अवघड होऊन बसल्याचे पंड्या यांनी नमूद केले. 

पालक विशेषतः या मुलांची आई कमालीच्या विमनस्क स्थितीत आहेत, कौटुंबिक निराशा व सततची काळजी या मुळे अनेकांच्या तब्येतीवर याचा परिणाम होऊ लागला आहे. या बाबत तातडीने या मुलांना भारतात परतण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या पालकांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com