अजित दादांनी शब्द पाळला; फडणवीसांची बदनामी करणाऱ्याला काही तासात बेड्या  - The person who defamed Fadnavis was arrested in a few hours | Politics Marathi News - Sarkarnama

अजित दादांनी शब्द पाळला; फडणवीसांची बदनामी करणाऱ्याला काही तासात बेड्या 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 मार्च 2021

विधानसभेत हा मुद्दा उपस्थित होताच वाकड पोलिसांनी दाखले विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.  

पिंपरी :  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केल्याप्रकरणी युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित होताच वाकड पोलिसांनी दाखले विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.  

पिंपरी-चिंचवडमधील जगतापनगर, थेरगाव येथे मंगळवारी (ता. २ मार्च) हा प्रकार घडला. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुरुवार (ता. ४ मार्च) गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करुन आरोपीने त्याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केला. त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला. 

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप तारे तारकांना उतरवणार

 

त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते यांच्यात रोष निर्माण झाला होता. या व्हिडीओ मुळे कार्यकत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाडक पोलिसांनी आरोपी दाखले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचा एकाच हेलिकॅाप्टरने प्रवास 
 

देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा  काँग्रेस आमदार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपचे आमदार संतप्त झाले होते. त्यानंतर, नाना पटोलेंनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला. फडणवीस यांनी या आक्षेपार्ह पोस्टवरुन राज्य सरकाला लक्ष्य केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्या कार्यकर्त्याला आजच अटक केली जाईल असे पवार म्हणाले होते. 

Edited By - Amol Jaybhaye   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख