राज्यातील १३ एसीपी झाले डीसीपी : राज्य सरकारकडून बढती
Government decides to promote 13 ACPs in the state

राज्यातील १३ एसीपी झाले डीसीपी : राज्य सरकारकडून बढती

त्यात पुण्यातील तिघांचा समावेश आहे.

पिंपरी  ः राज्यातील १३ सहायक पोलिस आयुक्तांना (एसीपी) राज्य सरकारने आज (ता. २३ एप्रिल) बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ते पोलिस उपायुक्त (डीसीपी) झाले आहेत. त्यात पुण्यातील तिघांचा समावेश आहे.

खुल्या प्रवर्गातील जागांवर ही पदोन्नती देण्यात आली आहे. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी पदोन्नतीवरील बदल्यांचा हा आदेश काढला आहे.

पुण्यातील एसीपी वैशाली विठ्ठल शिंदे यांची लोहमार्ग, नागपूर येथे, वैशाली माने यांची अमरावती, तर डॉ. शिवाजी पवार यांची राज्य पोलिस अकादमी, नाशिक येथे बदली झाली आहे.  
 
इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे 

१) अभय डोंगरे ः एसीपी (गुन्हे), सोलापूर शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना
२) रूपाली दरेकर ः एसीपी (वाहतूक), सोलापूर शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, औरंगाबाद
३) अनिता जमादार  ः अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन, औरंगाबाद ते पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, औरंगाबाद
४) किशोर काळे ः पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), सांगली ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे
५) अमोल झेंडे  ः एसीपी (एसबी), नवी मुंबई ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे
६) प्रदीप जाधव  ः एसीपी (विभाग-1), नाशिक शहर ते अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक
७) अशोक बनकर ः एसीपी(एसबी), औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, गोंदिया
८) रमेश धुमाळ ः अप्पर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहाय्यक महानिरीक्षक (नि.व स.), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई)
९) शोक थोरात ः उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला.
१०) अशोक नखाते ः एसीपी, नाशिक शहर ते उप संचालक, डी.टी.एस. (गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय), नाशिक.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in