काय सांगता? भाजप-शिवसेनेची अघोषित युती - What do you say Unannounced alliance of BJP-Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

काय सांगता? भाजप-शिवसेनेची अघोषित युती

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

शिवसेना भाजप यांची अघोषित युती झाली आहे. यामुळे भाजपच्या ललिता पाटील या बिनविरोध सभापती झाल्या आहेत.  

भिवंडी : राज्यात शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट असले तरी भिवंडी पंचायत समिती मध्ये शिवसेना भाजप यांची अघोषित युती झाली आहे. यामुळे भाजपच्या ललिता पाटील या बिनविरोध सभापती झाल्या आहेत.  

पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पडली. सभापतीपदी भाजपच्या राहनाळ पंचायत समिती गणातील भाजप सदस्या ललिता प्रताप पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. भिवंडी पंचायत समिती मध्ये एकुण 42 सदस्य आहेत. यामध्ये शिवसेना 20, भाजप 19, काँग्रेस  2 व मनसे 1 असे संख्याबळ आहे. 

भाजपच्या सभापती संध्या नाईक यांनी राजीनामा दिल्याने पंचायत समिती सभागृहात तहसीलदार अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक सभा दुपारी आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी भाजपाचे सदस्या ललिता पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा तहसीलदार पाटील यांनी केली. शिवसेना-भाजप यांची अघोषित युती झाल्याने पाटील या बिनविरोध निवडूण आल्या. 

या निवडी नंतर मावळत्या सभापती संध्या नाईक,उपसभापती सबिया भुरे, जिल्हा परिषद सदस्या सपना भोईर, राहनाळ सरपंच राजेंद्र मढवी, माजी सरपंच राजेंद्र भोईर, प्रताप पाटील, जितेंद्र डाकी यांचासह पदाधिकारी यांनी सभापती ललिता यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. 

Edited By - Amol Jaybhaye
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख