भाजपच्या माजी आमदाराच्या क्‍लबला नोटीस 

काही दिवसांपूर्वी त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे.
Unauthorized construction notice to former BJP MLA Narendra Mehta's club
Unauthorized construction notice to former BJP MLA Narendra Mehta's club

मीरा रोड (मीरा भाईंदर) : मीरा-भाईंदरमधील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्‍लबमधील अनधिकृत बांधकामाला महानगरपालिकेने नोटीस बजावाली आहे. सीआरझेडमुळे वादग्रस्त ठरलेले व आता मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम केल्याने त्या बांधकामावर प्रभाग अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी नगररचना विभागाने पत्र दिले आहे. 

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सीआरझेडमध्ये सेव्हन इलेव्हन (711) क्‍लबचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम यापूर्वीही वादग्रस्त ठरले होते. काही दिवसांपूर्वी त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे. महापालिकेने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्या ठिकाणी मंजूर बांधकामव्यतिरिक्त असलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी नकाशात लाल शाईने दर्शवून प्रभाग कार्यालय 4 कडे पाठवले आहे. 

वाढीव बांधकाम व मंजूर नकाशाव्यतिरिक्त बांधकाम केल्यामुळे तक्रारदार यांनी त्या बांधकामाला दिलेली बांधकाम परवानगी व भोगवटा दाखला रद्द करण्याची मागणी केली आहे. नगररचना विभागाचे अधिकारी दिलीप घेवारे यांनी संबंधित प्रभाग अधिकारी यांना या अनधिकृत बांधकामावर कारवाईचे पत्र दिले आहे. त्यावर आता पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अटी, शर्थीचे उल्लंघन... 

मीरा भाईंदर महापालिकेने बांधकाम परवानगी देताना अटी, शर्ती घालून दिलेल्या असतात. या ठिकाणी त्या अटी, शर्थीचे उल्लंघन करण्यात आले आहे. महापालिकेने 2008 तसेच 2015, 2017 व 2018 ची बांधकाम परवानगी देताना मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास महापालिकेने मंजूर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभपत्र रद्द करण्याची कार्यवाही, तसेच महापालिका अधिनियम 1949 व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1967 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट नमूद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com