...तर मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचेही सीएम बदला 

कोरोना विषाणूवरून राज्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबयाचे नाव घेत नाही. आता ही राजकीय धुळवड ठाणे महापलिकेपर्यंत येऊन पोचली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या टिकेलाठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना स्टाइल उत्तर दिले आहे.
 ... then change the CM of Gujarat and Uttar Pradesh.
... then change the CM of Gujarat and Uttar Pradesh.

ठाणे : कोरोना विषाणूवरून राज्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबयाचे नाव घेत नाही. आता ही राजकीय धुळवड ठाणे महापलिकेपर्यंत येऊन पोचली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या टिकेला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना स्टाइल उत्तर दिले आहे. 

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची बदली कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत करण्यात आली. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री बदणार का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. त्याला उत्तर देताना महापौर म्हस्के यांनी म्हटले आहे की, गुजरातचा मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्यामुळे आणि उत्तर प्रदेशात आकड्यांची लपवाछपवी सुरू आहे. त्यामुळे या दोन राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार का, असा उलटा सवाल त्यांनी शेलार यांना विचारला आहे. 

ठाण्यातील मृत्यूदर तीन टक्‍क्‍यांपर्यंत रोखण्यात यश आले आहे. याउलट भाजपची सत्ता असलेल्या पुणे शहरात हा दर 4.2 टक्के आहे; तर गुजरातमध्ये हाच दर तब्बल 6.7 टक्के आहे. भाजप सातत्याने मिरवते ते गुजरात मॉडेल हेच आहे का, असा बोचरा सवालही म्हस्के यांनी केला. सरकारची परवानगी असल्याशिवाय कोरोना चाचण्या करायच्या नाहीत, असा आदेश गुजरात सरकारने काढला आहे. या परवानग्या येण्यासाठी तीन ते सात दिवस लागतात. शेवटी तेथील उच्च न्यायालयाला याची दखल घ्यावी लागली. उत्तर प्रदेशची संख्या महाराष्ट्राच्या दुप्पट असूनही तपासणीचा दर महाराष्ट्रापेक्षाही कमी आहे. 

गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये आकड्यांची लपवाछपवी सुरू असल्याची टीका वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी करत आहेत. उत्तर प्रदेशात तर अधिक तपासण्यांची मागणी करणाऱ्या काही जिल्हाधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवांनी खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे. त्याबाबत टीका करणाऱ्या राज्याच्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या मागे तेथील सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यामुळे शेलारांनी त्यांच्या पक्षाचे नेते काय दिवे लावत आहेत, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही म्हस्के यांनी दिला. 

सरकारचे मंत्री स्वत:ची पर्वा न करता लोकांमध्ये जाऊन काम करत असल्यामुळेच काही मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाली. भाजपचे नेते मात्र लोकांमध्ये मिसळण्यास घाबरत असून केवळ राजभवनच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण असे ठिकठिकाणी भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वत: पीपीई किट घालून ते सीव्हिल रुग्णालयातील कोरोना वॉर्डातही गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. यानंतर भाजपच्या ठाण्यातील नगरसेवकांनीच मला फोन करून पालकमंत्र्यांना काळजी घ्यायला सांगा, अशा शब्दांत चिंता व्यक्त केली होती. 

आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com