धक्कादायक : पतीचा विरारच्या आगीत मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीनेही सोडला प्राण

चांदणी दोशी याही कोरोनाची लागणझाल्याने शहरातील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचार घेत होत्या.
Shocking : The wife gave up her life after realizing that her husband had died in Virar's fire
Shocking : The wife gave up her life after realizing that her husband had died in Virar's fire

विरार : विरार येथील विजय वलभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या १४ कोरोना रुग्णांचा शुक्रवारी (ता. २३ एप्रिल) पहाटे होरपळून मृत्यू झाला. या आगीत पतीचा मृत्य झाल्याचे समजताच कोरोनाबाधित असलेल्या पत्नीस ह्‌दयविकाचा झटका आणि त्यातच त्यांनी आपले प्राण सोडले.   

विजय वल्लभ रुग्णालयातील वातानुकूलीत यंत्रणेचा स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहेत. त्या आगीत उपचार घेणाऱ्या अतिदक्षता विभागतील कोविडच्या १७ रुग्णांपैकी १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कुमार दोशी हेही उपचार घेत होते. या आगीत त्यांचाही मृत्यू झाला. ही गोष्ट त्यांच्या पत्नी चांदणी दोशी यांना समजताच त्यांना ह्‌दयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चांदणी दोशी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्या विरार शहरातील जीवदानी रुग्णालयात उपचार घेत होत्या. दोशी परिवारावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, विरारच्या या विजय वल्लभ रुग्णालयास आग लागली तेव्हा रुग्णालयात ९० रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जवळपास १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे, तर चार जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. 


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेप्रकरणी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, विजय वल्लभ रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना याची झळ पोचू नये, यासाठी इतरत्र हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती मिळताच मुख्यमंत्री संबंधितांशी बोलले असून ही आग कशामुळे लागली, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेबाबत पुरेशी काळजी घेण्यात आली होती की नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 

हेही वाचा : कोरोनातून बऱ्या झाल्या ; पण आगीत होरपळून मृत्यू
 
विरार : आज पहाटे विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये क्षमा अरुण म्हात्रे या महिलेचाही मृत्यू झाला. क्षमा म्हात्रे या रुग्णालयात कोरोनावर एक महिन्या पासून उपचार घेत होत्या. त्यामध्ये त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी होणार होती, मात्र आगी मुळे त्यांनी जगाचाच निरोप घेतला. यामुळे त्यांच्या दोन लहान मुली अनाथ झाल्या आहेत. 

कळंब हे गाव वसई तालुक्यातील मच्छीमारांचे गाव म्हणून ओळखले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या गावातील क्षमा म्हात्रे या पहिल्या रुग्ण ठरल्या होत्या. त्यांच्यावर विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात गेल्या एक महिन्या पासून उपचार सुरू होते. कोरोना मधून त्या बऱ्या ही झाल्या. आज  त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार होती. परंतु दुर्देवाने पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपल्ल्याने त्यांनी ह्या जगाचाच निरोप घेतल्याचे समोर आले आहे. 

 क्षमा म्हात्रे या 45 वर्षाच्या होत्या त्यांना दोन मुली असून त्या आता अनाथ झाल्या आहेत. कळंब गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. कळंब हे गाव रेड झोन मध्ये येत असून या ठिकाणी दिवसा आड 1/2 मृत्यू होत आहेत. गेल्या आठवड्याभरात 7 ते 8 जण मृत्यू मुखी पडले असतानाही याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नाही. दुकाने ही उघडी असून मच्छीमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी बघायला मिळत असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
दोन दिवसांपासून एक पत्रकार आपल्या काकासाठी ऑक्सिजन बेड शोधत होते, पण त्यांना तो मिळत नव्हता अखेर पर्वा त्यांना विजय वल्लभ रुग्णालयात तो मिळाला होता. पण त्यांचे दुर्देव आज लागलेल्या आगीत जनार्धन म्हात्रे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com