राणेंनी दर्शन घेतल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शिवसैनिकांना केेले असे `शुद्धिकरण`

मुंबईत सेना आणि भाजपमधील राडा टळला...
rane at thackeray memoria
rane at thackeray memoria

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन शिवसेनेने घेऊन दिले. राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेत मुंबईत अडथळा आणण्याचा इशारा शिवसेनेने प्रत्यक्षात आणला नाही. त्यामुळे राणे यांचा मुंबईतील पहिल्या दिवसाचा दौरा भाजपच्या शक्तप्रदर्शनात पार पडला. त्यानंतर शिवसेनेने स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. (Shivsainiks purify memorial of Balasaheb thackeray after visit of Narayan Rane)  

उपशाखाप्रमुख अप्पा पाटील यांनी गोमूत्र, दूध शिंपडत करणार हे स्थळ शुद्ध केले. त्यामुळे राणे यांच्या दर्शनाचा शिवसेनेने शुद्धिकरणाने निषेध केल्याचे दिसून येत आहे. 

मुबंईत शिवसेना आणि भाजप यांच्यात राडा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र शिवसेनेने राणे यांच्या दौऱ्याकडे कानाडोळा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिस यंत्रणेने सुस्करा सोडला. परिणामी सेनेच्या बालेकिल्ल्यातून सेनेला ललकारत राणे यांचा दौरा मार्गस्थ झाला. स्मृतीस्थळावर वंदन करताना राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बाळासाहेब असते तर नारायण तू असाच मोठा हो, अशा शुभेच्छा दिल्या असत्या अशी भावना राणे यांनी व्यक्त केली. 

राणे यांच्या दौऱ्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका करत ही यात्रा म्हणजे जनतेची छळवणूक असल्याचा आरोप केला. या वादानंतर सेना आणि भाजपमध्ये फारशा ठिणग्या उडाल्या नाहीत. ''केंद्रीय मंत्री आपल्या राजकीय हव्यासापोटी हजारों लोकांची गर्दी करीत आहेत. हा नासमजपणा लोकांना दिसत आहे. आपण केंद्रीय मंत्री आहात. केंद्रात अनेक कामे आहेत. अनेकांना न्याय द्यायचा आहे. ते सोडून एक मुंबई महापालिका जिंकण्यासाठी हे तांडव चालले आहे, हे कशासाठी ? मुंबईसाठी आम्ही जर काहीच केले नसेल तर मुंबई नंबर वनवर आली कशी, मुख्यमंत्री ठाकरे हे देशातील मुख्यमंत्र्यामध्ये अव्वल क्रमांकावर आले कसे, या प्रश्नांचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. जन आशीवार्द यात्रेमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात घालू नका, ही हात जोडून विंनती,'' असे पेडणेकर म्हणाल्या.

तावडे फिरकले नाहीत...    

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईतील भाजपचे इतर नेतेही या वेळी उपस्थित होते. मुंबईचे नेते असूनही या यात्रेकडे न फिरकलेले पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे मात्र या यात्रेच्या वेळी हजर नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. 2015 मध्ये वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंत यांनी गळ्यात शाल घालून राणे यांचे स्वागत केले. हा मोठा चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com