कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या वादावर नाना पटोलेंनी काढला हा तोडगा 

राज्यात सत्ता असूनसुध्दा कॉंग्रेस​पक्ष कार्यकर्त्यांची काम होतनाहीत.
The settlement was reached by Nana Patole on the controversy over Bhiwandi city Congress presidency
The settlement was reached by Nana Patole on the controversy over Bhiwandi city Congress presidency

भिवंडी : भिवंडी शहर कॉंग्रेस अध्यक्षपदावरून वाद सुरू असल्याने तो मिटवण्यासाठी लवकरच दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात येतील, असे आश्वासन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, यापुढे गटबाजी खपवून घेणार नाही. पक्षविरोधी कारवाई व ध्येय धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. 

भिवंडी शहर जिल्हा कॉंग्रेस पक्ष कार्यालय व (स्व.) राजीव गांधी चौक नूतनीकरण कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भिवंडीत आले होते. त्यावेळी नगरसेवक रिषिका राका यांच्या पक्ष कार्यालयात महापालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी यांची विशेष बैठक पटोले यांनी घेतली. या वेळी माजी मंत्री अरिफ नसीम खान, भिवंडीचे शहराध्यक्ष रशिद ताहीर मोमीन, माजी महापौर जावेद दळवी, प्रदेश सचिव प्रदीप राका, प्रदेश सरचिटणीस तारीक फारुकी, नगरसेवक रिषिका राका, दयानंद चोरघे, मुख्तार खान आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

"पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांचे शक्तिकेंद्र आहे, त्यामुळे पक्ष कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे मत ऐकून त्याचे निवारण करणे गरजेचे आहे. पक्षाची शिस्त पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, पक्ष मोठा आहे, व्यक्ती नाही, हे धोरण सर्वांनी मनामध्ये निश्‍चित करून घ्यावे. यापुढे पक्षविरोधी कृती व काम करणारे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात येईल,'' असा इशारा पटोले यांनी दिला. 

राज्यात सत्ता असूनसुध्दा पक्ष कार्यकर्त्यांची काम होत नसल्याने आता जिल्हास्तरावर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्यात येतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसेच, आगामी निवडणुका या स्वबळावर लढविण्याच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू आहे, त्यासाठी राज्यात कॉंग्रेस पक्ष बळकट करणे आवश्‍यक आहे, त्यामुळे आता सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

राष्ट्रवादीत गेलेल्या नगरसेवकांबाबत हा निर्णय घेणार 

भिवंडीमध्ये अठरा नगरसेवकांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे, ही गंभीर बाब असून लवकरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. त्यांचे नगरसेवकपद रद्द केले जाईल, असेही पटोले यांनी सांगितले. या वेळी प्रदीप राका यांनी शाल देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com