वसई-विरारमध्ये राणे समर्थक एकाकी!

केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्या विरोधात वसई-विरार शहरात शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यामध्ये नारायण राणे यांना जमीन मंजूर झाला असला तरी त्यांच्या समर्थनार्थ वसईमध्ये भाजप पुढे आलेला नाही.
Narayan Rane
Narayan Rane

विरार : केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. (Narayan Rane made indecent statement regarding CM Uddhav Thakre) त्या विरोधात वसई-विरार शहरात शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली.. (Shivsena made agitation against that on Road) यामध्ये नारायण राणे यांना जमीन मंजूर झाला असला (Court grant bail to rane but BJP doesn`t came forward) तरी त्यांच्या समर्थनार्थ वसईमध्ये भाजप पुढे आलेला नाही.

त्यामुळे एकाकी पडलेले राणे समर्थक व भाजप उपजिल्हाध्यक्ष विश्वास सावंत चार-सहा कार्यकर्त्यांसोबत नालासोपारा पोलीस ठाण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन देताना दिसले आहेत.

केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री राणे यांनी शनिवारी वसईत जनआशीर्वाद यात्रा काढली होती. त्यात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात राणे यांचे स्वागत केले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक, उपजिल्हाध्यक्ष विश्वास सावंत, मनोज बारोट, युवा जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सिद्धेश तावड़े यांनी तर या स्वागत यात्रेत ठेका धरला होता. उपजिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांनीही विरार-बोळींज येथे त्यांचे जंगी स्वागत केले होते. या स्वागत आणि संवादाची छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावरही प्रसारित केली होती.

दिवसभर प्रचंड उत्साहात निघालेल्या या स्वागतयात्रेवर संध्याकाळी नारायण राणे यांनी `बविआ`चे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाणी फिरवले होते. या भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली. 

भाजपचे सिद्धेश तावड़े व अशोक शेळके यांनी याविरोधात घोषणाबाजी केली. मात्र श्री. राणे व आमदार ठाकूर यांनी आमची ३० वर्षांपूर्वीची मैत्री आहे, सांगत या भेटीचे समर्थन केले होते. यावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी श्री. राणे आणि ठाकूर यांच्यात मैत्रीचे संबंध असतीलही; पण अशा प्रकारे राणे यांनी ठाकूर यांना भेटणे योग्य नाही. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा हा पक्षाचा कार्यक्रम आहे. या यात्रेदरम्यान राणे हे ठाकूर यांना भेटल्याने वेगळा संदेश गेला आहे. या भेटीचा उपयोग बहुजन विकास आघाडीकडून येणाऱ्या निवडणुकीत करून घेतला जाईल. त्याचा फटका ठाकूर यांच्या विरोधात लढताना भाजपला बसेल, अशी खंत व्यक्त केली होती. 

ज्यांच्याविरोधात पक्षाला लढायचे आहे; त्यांच्याच मांडीला मांडी लावून आमचे नेते बसत असतील तर वसई विरारमध्ये पक्षाला भवितव्य काय असणार? असा प्रश्न वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी केला होता. दरम्यान वसई भाजपमध्ये केंद्रीय मंत्री राणे यांच्या कृती बाबत नाराजी असतानाच, महाड़ येथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. याविरोधात महाराष्ट्रभरात शिवसेना भाजप आणि राणे यांच्या विरोधात एकवटली असताना; वसई भाजपने  मात्र या प्रकरणात अलिप्त रहाणे पसंत केले आहे.

विशेष म्हणजे या प्रकणात परिवहन मंत्री अनिल परब दबाव होता, हे समोर आल्यानंतरही वसई भाजप शिवसेनेविरोधात प्रतिक्रिया देण्याकरता पुढे आलेला नाही. परिणामी राणे समर्थक असलेल्या विश्वास सावंत यांनाच नालासोपारा पोलिसांना हा गुन्हा दाखल करून घेण्याचे निवेदन द्यावे लागले आहे. नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतरच विश्वास सावंत यांनाही वसई भाजपमध्ये प्रवेश देऊन जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी पावन करून घेतले होते. विशेष म्हणजे त्यांना उपजिल्हाध्यक्ष पदही मिळाले होते. तेव्हापासून राजन नाईक यांच्यासोबत प्रत्येक आंदोलनात आणि सभेत विश्वास सावंत सावलीसारखे होते. पण कालच्या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी अंग काढून घेतल्याने राणे समर्थक विश्वास सावंत एकटे पडले आहेत. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com