प्रवीण दरेकर म्हणाले, `कर नाही त्याला डर कशाला?`

मी कोणत्याही दबावाला मी घाबरत नाही. भीक घालत नाही. एक काय 100 वेळा चौकशी करा.
Pravin darekar.jpg
Pravin darekar.jpg

मुंबई : मुंबई जिल्हा बॅंकेसंदर्भात (Mumbai Bank) काहींनी आमच्यावर आरोप केले. त्यात तथ्य नाही. काहींचे हवेत तीर मारने सुरू आहे. कर नाही तर डर कशाला. मी चौकशीला घाबरत नाही. मी कोणत्याही दबावाला मी घाबरत नाही. भीक घालत नाही. एक काय 100 वेळा चौकशी करा, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले. (Praveen Darekar said, "Why is he afraid of no tax?")

दरेकर म्हणाले, की मुंबई जिल्हा बँकेच्या संदर्भात काही माध्यमांत सतत बातम्या येत होत्या. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारा दरेकर आणि आता कुठे गायब, असा आरोप होत आहे, पण मी कुठेही गेलेलो नाही. कुणी असे आरोप केले असले, तरीही ठेवीदारांचा आमच्यावर विश्वास आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 123 कोटी घोटाळा हा कुठून आणला, हे आम्हाला समजलं नाही. याबाबत मी सात मुद्द्यांवर समजावून सांगतो. ही बॅंक `अ` वर्ग असणारी आहे. ज्या पिटीशन आहेत, त्या कोर्टाने डिसमिस केलेल्या आहेत. आपल्याकडे न्यायव्यवस्थेच्या पलीकडे काही नाही. मजूर संस्थांना सभासद करणे आणि किती जणांना सभासद करणे याबाबत नियम नाही. विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा आमच्या मुंबई बँकेचे कौतुक झालेले आहे. नाबार्डने देखील आमचं कौतुक केले आहे. ज्यांनी या बँकेवर भरभरून विश्वास ठेवला, त्याप्रकारे आमच्यावर विश्वास ठेवावा.
जरंडेश्वर साखर कारखान्याची बातमी काल पासून सुरू आहे. आमचे देखील 18 कोटी रुपये त्यांच्याकडे आहेत, असे दरेकर म्हणाले.

आमदार सुर्वे माझे राजकीय विरोधक

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे माझे राजकीय विरोधक आहेत. सुर्वे यांनी केवळ राजकीय सुडापोटी चौकशी करून काही हाती लागतय का, हे बघत आहेत. आम्हाला अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

प्रकाश सोळंकी यांच्याकडून जाणीवपूर्वक आमची चौकशी लावून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. पण यातून काहीच साध्य झाल नाही. मी इतरांना जसा विरोध करतो, तसा मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. यांचे हवेत तीर मारणे सुरू आहे. कर नाही तर डर कशाला. मी चौकशीला घाबरत नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला. ज्या भावनेतून जी चौकशी होईल, त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता असल्याने मला दबावात आणून मला अडचणीत आणत आहेत. जेवढे अडचणीत आणाल, तेवढा जास्त मी आक्रमकपणे प्रश्न मांडत राहील.

त्या माध्यमावर अब्रु नुकसानीचा दावा

मला बदनाम करणाऱ्या संबंधित माध्यमावर अब्रु नुकसाणीचा दावा टाकला आहे. मुंबई बॅंकेचा गोलमाल, असा कंटेंट चालवला, त्या बद्दल त्यांनी आमची माफी मागावी. अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय मुंबई बँकेने घेतला आहे. यासंदर्भात नोटीस त्यांना जाईल.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com