नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विमानतळ उभारणीस 1 फेब्रुवारी रोजी परवानगी दिली आहे.
Navi Mumbai airport will be named after Balasaheb Thackeray
Navi Mumbai airport will be named after Balasaheb Thackeray

नवी मुंबई : नवी मुंबईत प्रस्तावित असलेल्या विमानतळाचे 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण केले जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या संचालक मंडळाकडून हा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाला पाठवला आहे.

मागील काही वर्षांपासून नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत. विमानतळाच्या जमीनीवरूनही बरेच वाद झाले आहेत. आता या विमानतळाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विमानतळ उभारणीस 1 फेब्रुवारी रोजी परवानगी दिली आहे. त्यानंतर काही दिवसांतच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यावर सिडकोने शिक्कामोर्तब केले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोद्वारे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे नामकरण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मागवला होता. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना याबाबत सुचना दिली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने 4 जानेवारी रोजी सिडकोला याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. 

राज्य शासनाच्या पत्रानंतर सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार हा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाईल. 

देशातील अनेक विमानतळांना विविध क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींची नावे आहेत. त्यानुसार शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले होते. 

दरम्यान, विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून वाद निर्माण होऊ शकतो. नवी मुंबईसह उरण व पनवेल तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांकडून त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. या संघटनांकडून त्यांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com