Gulabrao Patil.jpg
Gulabrao Patil.jpg

नारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला : गुलाबराव पाटील

मुख्यमंत्र्यांनी लोकांना तत्काळ मदत केली पाहिजे होती; पण या राज्यात मुख्यमंत्रीपण नाही आणि प्रशासनही नाही.

जळगाव : नारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला आहे, त्यांना बोलणे गरजेचे आहे. बोलण्याकरताच त्यांना मंत्री केले आहे, ही चाबी भरल्याशिवाय हे खेळणे चालत नाही, अशी टीका पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. (Narayan Rane got a big laddu at the center just for speaking: Gulabrao Patil)

आज (ता. 26) चोपडा उपजिल्हा रुग्णालयात २ कोटी ४ लक्ष ५० हजार किंमतीचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांनी लोकांना तत्काळ मदत केली पाहिजे होती; पण या राज्यात मुख्यमंत्रीपण नाही आणि प्रशासनही नाही. चिपळूणमधील लोकांचे स्थलांतर केले नाही, जेवणाची व्यवस्था केली नाही. मग प्रशासन काम करते, असं कसं म्हणायचे, यास चिपळुणातील प्रशासन बेजबाबदार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. खोचक टिकेवर बोलते केले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्य चालविता येत असे म्हणणे पुर्णतः चुकीचे आहे. नारायण राणे यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही, त्यांना बोलण्यासाठी केंद्रात मंत्रिपदाचा मोठा लाडू मिळाला आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील शासनाविरूध बोलावेच लागणार आहे. त्यांना चाबी भरली जाते, त्याशिवाय हे खेळणे चालूच शकत नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.

हेही वाचा..

ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी देऊ

सिद्धटेक : ‘‘प्लॅस्टिकमुक्तीबरोबरच वृक्षलागवडदेखील गरजेची आहे. त्यामुळे देशी वृक्षांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे लागेल. आगामी काळात कार्यालय उभारणीसाठी आपण भरीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे प्रतिपादन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त व कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड फाउंडेशनच्या संचालिका सुनंदा पवार यांनी केले.

ग्रामपंचायतीचा पंधराव्या वित्त आयोग व आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत भांबोरे-हिंगणगाव ग्रामपंचायत हद्दीतील ७८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. या कामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माणिक लोंढे होते. सरपंच माधुरी पाटील, उपसरपंच कृष्णा शेळके, गणपत लोंढे, किसन पाटील, संभाजी शेळके, मकरंद पुंडे, विद्या जगताप, सोनाली लोंढे, शारदा रणदिवे, मनीषा गोसावी, प्रियांका शेळके, उमेश गोसावी, मनोज मुळे, सचिन जगताप उपस्थित होते.

ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मुलींनी तयार केलेले मास्क भांबोरे ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आले. प्रवीण राजेभोसले यांनी आभार मानले.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com