ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण नाकारणाऱ्या महापालिकांना कपिल पाटलांनी करून दिली ही आठवण 

मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली व भिवंडीतील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये शहराबाहेरच्या कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका दुजाभावाची आहे. ठाणे ग्रामीण भागातून मुंबई-ठाण्याची तहान भागवली जाते. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सावत्रपणाची वागणूक देऊ नये.
Kapil Patil reminded the Municipal Corporation of rejecting corona patients in rural areas
Kapil Patil reminded the Municipal Corporation of rejecting corona patients in rural areas

भिवंडी : मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली व भिवंडीतील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये शहराबाहेरच्या कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका दुजाभावाची आहे. ठाणे ग्रामीण भागातून मुंबई-ठाण्याची तहान भागवली जाते. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सावत्रपणाची वागणूक देऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात शहराबाहेरील रुग्णांना दाखल करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा तालुक्‍यातील रुग्णांना उपचारासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. भिवंडीत 2 हजार 583, शहापूरमध्ये 350 आणि मुरबाड तालुक्‍यात 136 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

या भागातील अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांना प्रवेश नाकारला जातो. तर या भागातील सरकारी रुग्णालयांनाही उपचार करण्यास मर्यादा आहेत, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले आहे. 

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील धरणांमधून मुंबई, ठाणे कल्याण-डोंबिवली शहराची तहान भागवली जाते, त्या भागातून दूध व भाजीपाल्याचाही पुरवठा होतो. मुंबई ठाण्याची मदार काही प्रमाणात ठाण्याच्या ग्रामीण भागावरच आहे, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णांना दुजाभावाची व सावत्रपणाची वागणूक का दिली जात आहे, असा सवाल करीत खासदार पाटील यांनी संबंधित महापालिकांना हा आदेश रद्द करण्याचे आदेश देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 


पुण्यात येत्या आठवड्यापासून पंधरा दिवस लॅाकडाउन?

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुढील आठवड्यात पंधरा दिवस लॅाकडाउन असण्याची शक्यता आहे. मात्र, लॅाकडाउन कधीपासून असणार याबाबत दोन्ही महापालिकेचे आयुक्त निर्णय घेणार आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश दिला असल्याचे समजते.राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता काही भागात लॉकडाऊन शिथिल केला आहे  मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. 

अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला नुकताच दिला होता.

दोन्ही शहरात आणि जिल्ह्यात अनेक नागरिक नियमांचं उल्लंघन करत नागरिक विनाकारण खुलेआम फिरत आहेत. नागरिक कोणत्याही कारणाशिवाय मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा इशारा दिला आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com