अमली पदार्थप्रकरणी राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयांची चौकशी - Inquiry into close associates of political leaders in drug case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

अमली पदार्थप्रकरणी राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयांची चौकशी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

आझमी हे एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय आहेत. आझमीला अमली पदार्थांचा तस्कर सफ्रान लकडावालाशी संबंधित असल्याने चौकशीला बोलाविले होते. लकडावालाला एनसीबीने ८ जुलैला अटक केली होती.

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अस्लम आझमीची शुक्रवारी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एसीबी) सात चौकशी केली. आझमी यांची पुढील आठवड्यात पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

आझमी हे एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय आहेत. आझमीला अमली पदार्थांचा तस्कर सफ्रान लकडावालाशी संबंधित असल्याने चौकशीला बोलाविले होते. लकडावालाला एनसीबीने ८ जुलैला अटक केली होती.

आझमीला २०१८ मध्येही दिल्लीच्या विशेष विभागाने अटक केली होती. त्याला गोवा एनसीबीने समन्स बजावून मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आझमी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी स्वतः त्याची चौकशी केली. सुमारे सात तास ही चौकशी चालली.

सफ्रान लकडावालाला एनसीबीने अटक केली होती. त्याच्या चौकशीत आझमीचे नाव उघड झाले होते. त्याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने आझमीला समन्स बजावला होता. त्यानुसार आझमीला १४ जुलैला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पण शुक्रवारी ही चौकशी करण्यात आली.
 

हेही वाचा..

मोबाईल शॉपीत चोरी प्रकरणातील तीन जणांना मुद्देमालासह अटक

कर्जत : मोबाईल शॉपी फोडून मोबाईलचोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख वीस हजार रुपये किमतीचे एकवीस मोबाईल संच जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

याप्रकरणी प्रमोद पोपट चव्हाण (रा. धालवडी, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून पप्पू सर्जेराव गायकवाड (वय २५ रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड), सूरज बाळू गायकवाड (वय २०, रा. बेनवडी, ता. कर्जत) व विकास कैलास घोलवड (रा. खडकी, ता. करमाळा जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.
प्रमोद चव्हाण यांच्या कुळधरण गावातील रस्त्यालगत असणारे प्रगती मोबाईल शॉपी दुकान चोरट्यांनी दुकान फोडून सुमारे पाच लाख वीस हजारांचे सव्वीस मोबाईल संच चोरून नेले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला.

या दरम्यान, पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की ही मोबाईल शॉपीफोडी ही आष्टी (जि. बीड) तसेच बेनवडी (ता. कर्जत) व करमाळा येथील आरोपींनी केली आहे. आता ते आरोपी चिलवडी गावचे शिवारात वीटभट्टीवर काम करत आहेत. पोलिस निरीक्षक यादव यांच्या सूचनेनुसार तत्काळ पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित इसम पप्पू सर्जेराव गायकवाड, सूरज बाळू गायकवाड यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांनी अधिक माहिती दिली की सोबत आणखी दोन जोडीदार आहेत, ते खडकी ता. करमाळा येथील आहेत.

या माहितीवरून खडकी येथे जाऊन विकास कैलास घोलवड यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींकडून गुन्ह्यातील चोरलेले चार लाख वीस हजार रुपये किमतीचे एकवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

 

हेही वाचा..

वेळ पडल्यास ताकद दाखवून देऊ

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख