कोविड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू 

लसीकरण करून निरीक्षणगृहात ठेवले असता, त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटांनीतेचक्कर येऊन पडले.
Driver dies in Bhiwandi after taking second dose of Kovid vaccine
Driver dies in Bhiwandi after taking second dose of Kovid vaccine

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कामतघर परिसरातील भाग्यनगर येथील कोविड लसीकरण केंद्रात लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा केंद्रांत दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मात्र, मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतरच कळेल, असे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी सांगितले. याबाबत आरोग्य विभाग कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. 

सुखदेव महिपती किर्दत (वय 41, रा. मनोरमा नगर, ठाणे) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. किर्दत हे एका खासगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे चालकाची नोकरी करतात.  

सध्या सर्वत्र कोविड लसीकरण प्राधान्यक्रमाने सुरू आहे. शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांपाठोपाठ महानगरपालिका कर्मचारी, पोलिस, खासगी वैद्यकीय व्यवसायिक व त्यांच्या आस्थापनात काम करणारे कर्मचारी यांना ही लस उपलब्ध करून दिली जात आहे. भिवंडी शहरातील नामांकित नेत्रतज्ज्ञांकडे खासगी वाहनचालक म्हणून काम करणारे सुखदेव महिपती किर्दत यांनी पहिला डोस घेतल्यानंतर आज (ता. 2 मार्च) दुपारी भिवंडीतील कामतघर भागातील भाग्यनगर केंद्रात दुसरा डोस घेण्यासाठी गेले होते. 

तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा रक्तदाब, ऑक्‍सिजन तपासणी करून 11.05 मिनिटांनी त्यांना लसीकरण करून निरीक्षणगृहात ठेवले असता, त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटांनी त्यांना चक्कर येऊन पडले. त्यांच्यावर प्रथमोपचार करूनही ते शुद्धीत न आल्याने त्यांना तत्काळ शहरातील (स्व.) इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे यांनी त्यांना मृत घोषित केले. 

किर्दत यांचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, असे डॉ खरात यांनी सांगितले. या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्यासाठी ठाणे येथील आरोग्य विभाग सहायक संचालक डॉ. चाकूरकर आल्याची माहिती महानगरपालिका मुख्य आरोग्य अधिकारी डॉ खरात यांनी दिली. 

लस दुपारऐवजी सकाळी का देण्यात आली? 

मृत सुखदेव किर्दत हे सकाळी घरून सुस्थितीत कामावर निघाले होते, त्यांना दुपारी लस देण्यात येणार होती. परंतु ती सकाळीच देण्यात आली. ती का देण्यात आली, याबाबत मला पूर्ण माहिती नाही. माझ्या पतीचा मृत्यू लसीमुळे की आणखी कोणत्या कारणामुळे झाला, याची चौकशी होऊन न्याय मिळावा, अशी भूमिका मृत सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com