नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी 

सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे.
The draft voter list for Navi Mumbai, Vasai-Virar and Kolhapur Municipal Corporation elections will be released on February 16
The draft voter list for Navi Mumbai, Vasai-Virar and Kolhapur Municipal Corporation elections will be released on February 16

मुंबई : नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. त्याचसोबत 16 महापालिकांमध्येही पोटनिवडणुका रंगणार आहेत. या तीन महापालिका निवडणुकांसह इतर विविध 16 महापालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 16 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज (ता. 2 फेब्रुवारी) दिली. 

मदान यांनी सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 3 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. येत्या 8 मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 12 मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली. 

विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी (कंसात कारण) : नाशिक- 4अ (निधन), धुळे- 5ब (राजीनामा), परभणी- 11 ब (निधन), 14 क (निधन), ठाणे- 30अ (जात प्रमाणपत्र अवैध), 15ड (निधन), 23ड (निधन), अहमदनगर- 9क (अनर्ह), नांदेड वाघाळा- 13अ (निधन), नागपूर- 8ब (जात प्रमाणपत्र अवैध), मीरा भाईंदर- 10ड (निधन), मालेगाव- 20क (निधन), पिंपरी चिंचवड- 1ड (निधन), 14अ (निधन), 4ब (निधन), उल्हासनगर- 14ड (निधन), 8क (निधन) सोलापूर- 6क (निधन), सांगली मिरज कुपवाड- 16अ (निधन), अकोला- 4अ (निधन), 8क (निधन), 3क (निधन), भिवंडी निजामपूर- 9ब (राजीनामा), पुणे- 8क (निधन) आणि 29ब (निधन). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com