दिल्लीत जाण्याची अनेकांना संधी.... त्यांना बसायलाही जागा नाही : ठाकरेंच्या टोल्याने हास्यकल्लोळ

उद्धव ठाकरे यांचा टोला राणेंना असल्याची चर्चा..
uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई, ता. १६ : "तांदळातील खड्यांसारखे सहकार क्षेत्रातील खडेही बाजुला करीत, ही चळवळ पुन्हा मजबूत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी मुंबईत दिले. “”देशभरातील सहकाराला ताकद आणि दिशा देण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याने महाविकास आघाडी सरकार सहकारला बळ देणारच,”” असेही त्यांनी स्पष्ट केले. चळवळ उभारलेल्यांच्या केवळ आठवणी नको तर; त्यांचे काम पुढे नेण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले.

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त मुंबईत विधान भवनात आयोजिलेल्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात राजकीय टोलेबाजी केली आणि सभागृहात हशा पिकला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणातील 'राजकारणापलीडे जाऊन काम करण्याची गरज आहे, हा मुद्दा उपस्थितीत केला आणि म्हणाले, ‘“प्रवीणजी, राजकारणाकडे कोणी जायचे, कोणी काय करायचे हेही महत्त्वाचे आहे, ‘ अशा शब्दांत ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना चिमटे काढले. 'दिल्लीत जाण्याची संधी अनेकांना मिळते. त्यांना बसायलाही जागा मिळत नाहीत.. त्यांना उगाच उभे राहावे लागते. मात्र गुलाबराव पाटील यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्र उभा करण्याचे काम केले,' असेही ठाकरे यांनी सांगितले.

राजकारणासाठी लक्ष्मण रेषा आखूनच सगळ्यांनी सहकारला पुढे नेले पाहिजे. त्यासाठी २१ व्या शतकातील सहकारापुढेची आव्हाने आणि ती दूर करण्याचा कार्यक्रमासाठी स्वतंत्र परिषद घेण्याची अपेक्षा निंबाळकर यांनी व्यक्त केली. गुलाबराव आणि सहकारातील अन्य मंडळींच्या कामांच्या आठवणीसोबत कृतीची गरज आहे. या मंडळींनी ज्यांच्यासाठी कार्य केले, त्यासाठी ठोस निर्णय आणि उपायांची अंमलबजावणी हवी, असेही त्यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, "आयुष्यभर सहकार क्षेत्रात प्रचंड काम केले आणि ही चळवळ तरुणांमध्ये रुजविली; म्हणूनच ती वाढली आणि टिकली. सरकारमधील मंत्रीपद नाकारून पाटील हे आपले काम करीत राहिले. याच काळात खासगी क्षेत्र कमी करून सहकाराला वाव दिला गेला. परंतु, आता हे क्षेत्र अडचणीत येऊन अनेक संस्था बंद पडल्या. आता उलट सहकारातून खासगीकरण वाढण्याची भीती आहे. सहकारी साखर कारखाने अडचणीतून बाहेर काढले पाहिजेत. सहकार चळवळीकडे आपुलीकीने पाहण्याची गरज आहे. आपुलकीने पाहताना मात्र चुका झाकायच्या नाहीत. "

कदम म्हणाले, "केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती केल्याने शंका पुढे येत असल्याने गुलाबराव पाटील यांचे कार्य ठळकपणे नजरेत येते. शैक्षणिक क्षेत्रातही यांचे काम उजवे होते."

"राजकारणातील नव्या पिढीला पाटील यांच्या कामाची ओळख हवीच, अशी अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली. कोल्हापूर,, सातारा आणि सांगली ह्यांत दरवर्षी येत असल्याकडे लक्ष वेधत, या भागांतील पूरस्थितीवर उपाय आणि नियंत्रण करण्याच्या उद्देशाने पूर प्राधिकरण नेमण्याची मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली. पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्तावित केले. माजी आमदार उल्हास पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com