नाना पटोलेंच्या दौऱ्यात घोषणाबाजी ! पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला - Announcement during Nana Patole's tour! Tensions eased with police intervention | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

नाना पटोलेंच्या दौऱ्यात घोषणाबाजी ! पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने निवळले. भारत नगर मधील धोकादायक स्थितीत असलेल्या लोकांना पालिकेच्या बांधलेल्या इमारतींमध्ये कायम स्वरूपी घर देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणारस असे नाना पाटोले यांनी सांगितले.

मुंबई : जुलैला चेंबूरच्या भारत नगरमधे भिंत कोसळून 19 जनांचा बळी गेला. आज महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थलांतरित केलेल्या कुटुंबियांना घरघुती साहित्य आणि काही जणांना रोख स्वरूपात मदत केली. (Announcement during Nana Patole's tour! Tensions eased with police intervention)

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे या विभागातील कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि आमच्या विभागात पण पाहणी करण्यासाठी चला, अशी मागणी करू लागले. या वेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लोटत मागे नेले. त्यावेळी पोलीस आले आणि त्यांनीही या कार्यकर्त्यांना मागे केले. त्यावेळी घोषणाबाजी केली. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने निवळले. भारत नगर मधील धोकादायक स्थितीत असलेल्या लोकांना पालिकेच्या बांधलेल्या इमारतींमध्ये कायम स्वरूपी घर देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणारस असे नाना पाटोले यांनी सांगितले.

 

हेही वाचा..

नागरिकांच्या अडचणी सोडविणार : रोहित पवार

मिरजगाव : ‘‘नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये. गावात आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे. नागरिकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक अडचणी सोडविणार आहे,’’ असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मतदारसंघातील नागरिकांशी आमदार रोहित पवार यांनी आज संवाद साधला. मिरजगाव व थेरगाव (ता. कर्जत) येते बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी पवार यांच्यासमोर मांडल्या. विविध गावांमधील रखडलेल्या योजना, आवश्यक असलेली नूतन कामे आणि नागरिकांचे वैयक्तिक प्रश्न पवार यांनी ऐकून घेतले. नागरिकांनीही अडचणींचा पाढा वाचला. पवारांनी सर्व समस्या आणि अडचणी गांभीर्याने ऐकून घेतल्या. सर्वच प्रशासकीय विभागांचे अधिकारी हजर असल्यामुळे, ज्या विभागाची समस्या असेल तेथील संबंधित अधिकाऱ्यांना योग्य दखल घेऊन समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या. एवढेच नव्हे, तर ज्या ठिकाणी दिरंगाई अथवा हेतुपुरस्सर कामे केली जात नसतील, त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना तंबी देऊन कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही पवार यांनी केल्या.

जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, पंचायत समिती सभापती मनीषा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे उपस्थित होते. तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी
अमोल जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर उपस्थित होते.

 

हेही वाचा..

मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहणार

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख