जालना मनोरुग्णालयाच्या शोधाची राजेश टोपेंनी घ्यावी दखल!

ब्रिटिशकाळापासून जालन्यात असलेले भव्य मनोरुग्णालय नंतरच्या काळात हैदराबादला हलविण्यात आले. या टप्प्यात जालन्यातून या हॉस्पिटलचा पुसला गेलेला इतिहास अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने शोधून काढलाय तो जळगावातील विख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी.
Jalna Bulding
Jalna Bulding

जळगाव : ब्रिटिशकाळापासून जालन्यात असलेले भव्य मनोरुग्णालय नंतरच्या काळात हैदराबादला हलविण्यात आले. (British era Psychiatric hospital of jalna later on shifted to Hyderabad) या टप्प्यात जालन्यातून या हॉस्पिटलचा पुसला गेलेला इतिहास (In this circumstances Hospital historical refrences rub off) अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने शोधून काढलाय (Dr Neeraj Dev of jalgaon`s consistent  efforts bring forward this history) तो जळगावातील विख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी. 

जालन्यात नुकतेच मनोरुग्णालय मंजूर झाले व त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नांनी ते मंजूर झाल्याचे बोलले जात असले, तरी इतिहासात काही त्रुटींमुळे या मनोरुग्णालयाची पुसलेली पाने शोधून काढण्याचे संशोधन ज्या खानदेशातील तज्ज्ञाने केले त्या डॉ. देव यांच्या प्रयत्नांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. 

...असा सुरू झाला शोध 
मुळात राज्यात केवळ येरवडा (पुणे), रत्नागिरी, ठाणे व नागपूर अशा चार ठिकाणी मनोरुग्णालये आहेत. खानदेश, मराठवाड्यातील रुग्णांसाठी ही चारही रुग्णालये दूर असल्याने सोयीची नाहीत. या दोन्ही क्षेत्रांच्या दृष्टीने सोयीचे म्हणून एखादे रुग्णालय हवे म्हणून डॉ. देव यांनी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांत त्यांना जालन्याला ब्रिटिशकाळापासून (१८९५ ते १९५३) ४०० बेडचे मनोरुग्णालय होते, १९५३ ला ते रुग्णांसह हैदराबादला हलविल्याचे त्यांच्या आजीकडून कळाले. त्यातून या रुग्णालयाचा शोध सुरू झाला. 

पार्श्‍वभूमी आली समोर 
डॉ. देव यांनी या रुग्णालयाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी काही जुनी कागदपत्रे, नोंदींच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. माहितीच्या अधिकारात त्यांनी ११ मुद्द्यांच्या आधारे महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्य सरकारांकडे माहिती मागविली. ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र शासनाने त्यासंबंधी आरोग्य संचालनालयाचा संदर्भ दिला, तर या संचालनालयाने औरंगाबाद आरोग्य उपसंचालकांकडे माहिती घेण्यासंबंधी सूचित केले. या शोधप्रवासात डॉ. देव यांनी काही जुनी गॅझेट्स‌ धुंडाळली. जालन्यातील बुजूर्ग लोकांना रुग्णालयाबबत विचारले. तेथील एका वयोवृद्ध मुस्लिम डॉक्टरने ‘दारुल मजानिन’ या नावाने जालन्यात भव्य रुग्णालय होते या इतिहासाला दुजोरा दिला. 

चुकीचा इतिहासही समोर 
या शोधकार्यात रुग्णालयाचा चुकीचा इतिहासही समोर आला. हैदराबादच्या यंत्रणेतून हे हॉस्पिटल १८९५ला हैदराबादला स्थापन झाले. १९३९ला ते जालन्यात स्थलांतरित झाले आणि पुन्हा १९५३ ला हैदराबादला हलविल्याचा चुकीचा इतिहासही मांडल्या गेल्याचे डॉ. देव यांना समजले. या इस्पितळात निजामाच्या एका बेगमवरही उपचार केल्याचा दाखला यानिमित्ताने समोर आला. 

पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू 
जालन्याला हे मनोरुग्णालय होते, यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी डॉ. देव यांनी प्रयत्न सुरू केले. जानेवारी २०१३मध्ये त्यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन या मनोरुग्णालयाच्या जालन्यातील अस्तित्वाचे पुरावे सादर करत माहिती दिली. पुन्हा हे हॉस्पिटल सुरू व्हावे, यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरू झाला.

मंजुरी व भूमिपूजन 
या पाठपुराव्याला यश येऊन २०१५ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने जालन्यात मनोरुग्णालयास मंजुरी दिली. गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्याची पायाभरणी झाली. परंतु मंजुरीपासून आतापर्यंत त्यासाठी निधीची तरतूद होऊ शकली नव्हती. जालन्याचेच लोकप्रतिनिधी असलेल्या राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य खाते असल्याने त्यांनी परवा मंत्रिमंडळ बैठकीत ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली. या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामग्री, रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे, मनुष्यबळ यासाठी १०४ कोटी ४४ लाखांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भातील किमान १४ जिल्ह्यांतील रुग्णांची त्यामुळे सोय होईल. 

...
टोपेंमुळेच होऊ शकते शासनदरबारी नोंद 
मुळात स्वत: राजेश टोपे हे मितभाषी व प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. कोविड काळात त्यांनी राज्यासाठी केलेल्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. जनतेनेही त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मात्र, आपल्याच मतदारसंघात कधीकाळी असलेल्या मनोरुग्णालयाचे अस्तित्व शोधून ते त्याच जालन्यात पुनर्स्थापित करण्यासाठी एक झपाटलेला तज्ज्ञ प्रयत्न करतो, त्याची दखलही टोपेंनी घेतली नाही, हे दुर्दैवच. कृतज्ञता म्हणून आणि शासन दप्तरी या शोधाची नोंद घेण्यासाठी टोपे यांनी पुढाकार घ्यायला हवा. डॉ. देव (मो. ९८६०००३००२) यांना किमान फोन करून त्यांची दखल घ्यावी. शासनदरबारी डॉ. देव यांच्या नावाची नोंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, ही अपेक्षा आहे. डॉ. देव यांच्या या धांडोळ्याची मंत्री टोपे दखल घेतील, अशी अपेक्षा संशोधन क्षेत्रात नक्कीच आहे.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com