हे विषाणू जगाला कुठे घेऊन जाणार आहेत?

`हे नेमके काय चाललेय हेच कळत नाही. रोज नवे विषाणू पुढे येत आहेत. एका पाठोपाठ येणारे हे विषाणू जगाला कुठे घेऊन जाणार आहेत? हेच कळत नाही`
Bhujbal Chhagan
Bhujbal Chhagan

नाशिक : दोन दिवसांपूर्वी राज्यात झिका विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला. (Zika virus patient found in purandar two days before)त्यामुळे खळबळ उडाली. यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उद्वेगाने म्हणाले, `हे नेमके काय चाललेय हेच कळत नाही. (What`s this going on we doesn`t Understood) रोज नवे विषाणू पुढे येत आहेत. एका पाठोपाठ येणारे हे विषाणू जगाला कुठे घेऊन जाणार आहेत? (one after one virus founds, where these virus will take this world) हेच कळत नाही`  

राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण नुकताच आढळला. तो रुग्ण बरा देखील झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची चर्चा झालीच. यासंदर्भात विचारणा झाल्यावर श्री. भुजबळ म्हणाले, झिका काय?, टिका काय?, मिका काय?, डेल्टा काय? प्लस काय? अन् मायनस काय?. रोज नवे विषाणू येत आहेत. एका पाठोपाठ येणारे विषाणू हे विषाणू जगाला कुठे घेऊन जाणार आहेत. त्याची कारणे, उपचार आणि उपाययोजना करण्यात सगळी वैद्यकीय तज्ञांची यंत्रणा व्यस्त आहे. 

ते म्हणाले, एक औषध शोधले की दुसरा विषाणू येतो आहे. त्याबाबत काय काय उपाय करायचे याची सरकार सातत्याने काळजी घेत आहे. सध्या नागिरकांत मास्क आहे. लॅाकडाऊन आहे. तरीही पुरंदर तालुक्यात झिकाचा रुग्ण आढळला. केरळमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. ही स्थिती जगभरात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची जास्तीत जास्त काळजी घ्यावी.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com