जेव्हा छगन भुजबळ इक्बाल शेख झाले तेव्हा!

`मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी` हे शिवसेनेचे ब्रीद. ( त्यासाठी आज बरोब्बर पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी कन्नड भाषेच्या सक्तीविरोधात बेळगावात वेषांतर करून प्रकट होत आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी दुबईचा व्यापारी इक्बाल शेख यांचे वेषांतर करून गोवामार्गे बेळगावात प्रवेश करून कानडी पोलिसांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
CB Belgaum
CB Belgaum

नाशिक : `मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी` (justice & Rights foe Marathi People was slowgun of Shivsena) हे शिवसेनेचे ब्रीद. त्यासाठी आज बरोब्बर पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal Enters in belguam with a make up in Trader Iqbal Shaikh) कन्नड भाषेच्या सक्तीविरोधात बेळगावात वेषांतर करून प्रकट होत आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी दुबईचा व्यापारी इक्बाल शेख यांचे वेषांतर करून गोवामार्गे बेळगावात प्रवेश करून कानडी पोलिसांना आश्चर्याचा धक्का (Karnatka Police was Shocked)  दिला होता. 

बेळगाव, कारवार भागात कर्नाटक सरकारने १९८६ मध्ये कन्नड भाषेची सक्ती केली. त्यात मराठी भाषकांचा आवाज दडपून टाकण्याचे त्यांचे धोरण होते. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मराठी भाषकांची बाजू घेतली. कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्रातील कोणालाही बेळगावला येऊ दिले जात नव्हते. याविरोधात शिवसेना विरोध व आंदोलनावर ठाम होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तशी घोषणाच केली होती. शिवसेनेचे आक्रमक नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी धाडस व कल्पकतेचा मिलाफ घडवीत शिवसेनाप्रमुखांचा तो आदेश प्रत्यक्षात आणला. तो दिवस होता ४ जून. अर्थात बरोबर पस्तीस वर्षापूर्वी.

तेव्हा महाराष्ट्रातून कर्नाटकात येण्याचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सीमेवरील हे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने श्री. भुजबळ यांनी गोवा मार्गे बेळगावला जाण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी अगदी चित्रपटातील एखादा प्रसंग वाटावा असे नाट्य घडविले. त्यांनी दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा केली. मुंबईहून एक अॅम्बासेडर कार घेऊन ते गोव्याहून बेळगावात दाखल झाले. मध्यरात्रीच्या सुमारास ते बेळगावात दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या विरोधात गनिमी काव्याने शिवसेनेचे  आंदोलन केले. 

या आंदोलनानंतर कर्नाटक पोलिसही ही मंडळी बेळगावात कशी दाखल झाली?, या प्रश्नाने आश्चर्यचकीत झाली. त्यांनी भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. अटक केल्यावर त्यांची रवानगी धारवाड कारागृहात करण्यात आली. दोन महिने त्यांना कारागृहात काढावे लागले. दोन महिन्यांनी सुटका झाल्यावर ते मुंबईत परतले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाठीवर थाप देत कौतुक केले. मराठी भाषिकांसाठी झालेल्या त्या आंदोलनाचा आज बरोब्बर पस्तीस वर्षे झाली. शिवसेनेचे ब्रीद होते, `मराठी माणसाच्या न्याय, हक्कासाठी` या आंदोलनाने ते प्रत्यक्षात आल्याचा विश्वास बेळगावच्या मराठी माणसांना मिळाला. 

या आंदोलनात भुजबळ यांच्या समवेत दगडू सपकाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक असे विविध शिवसेना कार्यकर्ते होते. त्यांना वेशभूषा करण्यासाठी शिवसेना नेते प्रमोद नलावडे यांनी देखील मदत केली होती. 
....
 हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com