`भाजप`वासी होऊन यतीन कदम कोणाचे राजकारण संपवणार? - What political move take yatin kadam After joining bjp, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

`भाजप`वासी होऊन यतीन कदम कोणाचे राजकारण संपवणार?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

येथील युवा नेते यतीन रावसाहेब कदम यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्याशी राजकीय भाऊबंदकी असलेल्या कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने निफाडच्या राजकारणात ते चमत्कार घडवणार की पुन्हा ओझर गावापुरतेच मर्यादीत होतात याची उत्सुकता आहे.

ओझर : येथील युवा नेते यतीन रावसाहेब कदम यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. (Yatin kadam joined BJP Today in presens of Devendra Fadanvis) शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्याशी राजकीय भाऊबंदकी (Whether his political rivalry keep on with Shivsena leader Anil Kadam)  असलेल्या कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने निफाडच्या राजकारणात ते चमत्कार घडवणार की पुन्हा ओझर गावापुरतेच मर्यादीत होतात याची उत्सुकता आहे.  

आज श्री. कदम यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश केला. यावेळी  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपला निफाडच्या राजकारणाला एक चेहरा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत यतीन कदम हेच भाजपाचे उमेदवार असतील असे संकेत यावेळी मिळाले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांनी मतविभागणी केल्याने राष्ट्रवादीच्या गळ्यात विजयाची माळ टाकली होती. त्यात त्यांचे परंपरागत, अनेक वर्षे राजकीय भाऊबंदकी असलेले चुलत बंधु व शिवसेनेचे नेते अनिल कदम यांचा पराभव केला. मात्र राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आमदार झाले. त्यांनी केलेल्या मोर्चेबांधणीत त्यांनी आपली मांड एव्हढी घट्ट केली आहे, की त्यांना हलविणे सोपे राहिलेले नाही. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीआधी जिल्हा परिषद, ओझर नगर परिषद निवडणूक असल्याने त्यांना आपले राजकारण पुढे नेण्यासाठी गावातील स्थान बळकट करावे लागेल. त्यात ते तालुक्याएैवजी गावातच अडकून पडण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते.  

आज झालेल्या प्रवेश सोहळ्यात फडणवीस यांनी, गेल्या विधानसभा निवडणुकीत निफाडची उमेदवारी यतीन कदम यांना दिली असती तर कदाचित आज ते विधानसभेत दिसले असते, असे सूचक उद्गार काढले. त्यामुळे पुढील निवडणुकीत कदम यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे यतीन कदम यांचे  वडील स्वर्गीय रावसाहेब  कदम हे शिवसेनेचे आमदार होते. मातोश्री मंदाकिनी कदम या सुद्धा साडेसात वर्षे शिवसेनेच्या आमदार होत्या. आई आणि वडील दोघेही आमदार असल्याने यतीन कदम यांना देखील आमदार होण्याची संधी मिळणार का याची चर्चा आहे. 

निफाड तालुक्यात दोन टर्म वगळता स्वर्गीय आमदार रावसाहेब कदम यांच्यानंतर शिवसेनेचीच सत्ता राहिली. त्या सत्तेचा ओझर हा केंद्रबिंदू राहिला. यापूर्वी यतीन कदम यांनी वडील आणि मातोश्रीनंतर राजकारणात मनसे व नंतर अपक्ष असे प्रयोग केले. त्यांनी अपक्षांचा एक गट केला. त्यातून ग्रामपंचायत काबीज केली. एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी यामुळे त्यांना भाजपा शिवाय पर्याय नव्हता. आगामी निवडणुकांसाठी पक्षात प्रवेश करणार करणार असे सुतोवाच त्यांनी केले होते. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. त्यामुळे आता नगरपरिषदेच्या व इतर आगामी निवडणुकीत तिहेरी रंगत पहायला मिळेल. त्यामुळे कदम यांचा भाजप प्रवेश चर्चेचा विषय देऊन गेला आहे.

येथील ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होण्याआधी निवडणुक जाहिर झाली. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून नगरपरिषदच होणार म्हणून माघार घेतली. परंतु यतीन कदम यांनी निवडणुकीतून माघार न घेता शेंडी तुटो अथवा पारंबी अशी भूमिका घेतली. त्यात त्यांचे उमेदवार सोळा जागांवर विजयी होऊन सत्ता संपादीत केली. परंतु नगरपरिषदेची घोषणा करून माजी आणदार अनिल कदम यांनी त्यांची सत्ता औटघटकेची ठरवली. 

ग्रामपंचामतीची सत्ता सेनेकडून हिसाकाऊन घेणारे यतीन कदम यांनी रितसर भाजपात प्रवेश केल्याने आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे एक आयता नेता मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोष वाढला आहे. इतरत्र पर्याय शोधणारेही आता एकत्र येण्याची चर्चा रंगू लागती आहे.
...
हेही वाचा...

भाजपकडून आयारामांना पायघड्या; निष्ठावंतांना नारळ!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख