जनतेने नाकारलेल्या नरेंद्र मोदींविरोधात घराघरात लाट - wave against modi In Every home, Maharashtra Politcs | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

जनतेने नाकारलेल्या नरेंद्र मोदींविरोधात घराघरात लाट

संपत देवगिरे
रविवार, 2 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री दिवसरात्र पश्चिम बंगालमध्ये प्रचारात गुंतले होते. तरीही ममता बॅनर्जी यांनी एकटीने लढा देऊन त्यांचा प्रचंड पराभव केला.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री दिवसरात्र पश्चिम बंगालमध्ये प्रचारात गुंतले होते. तरीही ममता बॅनर्जी यांनी एकटीने लढा देऊन त्यांचा प्रचंड पराभव केला. याचा अर्थ जनतेने भाजपला नाकारले. या पक्षाविरोधात आता घरा घरात लाट आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा पश्चिम बंगालमध्ये दारुण पराभव झाला आहे. केरळमध्ये त्यांना औषधालाही जागा मिळालेल्या नाहीत. तमिळनाडूत त्यांनी आण्णा द्रमुक (एआयडीएमके) पक्षाला पाठींबा दिला होता. तीथे द्रमुकचे स्टॅलीन यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. पुद्दुचेरीमध्ये अद्याप चित्र स्पष्ट नाही. फक्त आसाममध्ये त्यांनी आपल्या जागा राखलेल्या आहेत. हे चित्र बोलके आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे. 

ते पुढे म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा जवळ जवळ दिवसआड सभा घेत होते. त्यांचे दहा केंद्रीय मंत्री तीथे ठाण मांडून बसले होते. प्रचंड यंत्रणा व नेत्यांची फौज भाजपचा प्रचार करीत होती. प्रसारमाध्यमे फक्त त्यांच्याच बातम्या देत होत्या. हे चित्र असताना ममता बॅनर्जी या सर्व फौजे विरोधात एकहाती ळडत होत्या. झाशीची राणी जशी मेरी झांसी नही दुंगी अशी घोषणा देऊन त्वेषाने मैदानात उतरली होती, तशा ममता बॅनर्जी लढल्या. जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले. 

कोरोनाकडे लक्ष दिले पाहिजे होते
पंतप्रधान यांनी देशात कोरोनाचा प्रसार होत असताना केवळ पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यांनी कोरोनावर लक्ष दिले असते तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. त्यामुळे आता घराघरात त्यांच्या विरोधात वातावरण आहे. हे वातावरण प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळेच भाजप केरळ, तमिळनाडू यांसह कुठेच दिसत नाही. 
 ...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख