अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका
Amit Thakre

अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका

महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, असे स्पष्टीकरण सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिले.

नाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी दिले. मनसे सत्ताकाळात झालेल्या प्रकल्पांवरच सत्ताधारी भाजप पोळी भाजत असून, (BJP taking benifits of devolopment of MNS tenure) प्रकल्पासंदर्भात राजकारण बाजूला ठेवून सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.

मनसे सत्ताकाळातील प्रकल्पांच्या दुरवस्थेची पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. महापालिकेत मनसेची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात सामाजिक दायित्वाच्या निधीतून प्रकल्पांची उभारणी करण्यात आली, परंतु नाशिककरांना समर्पित केलेल्या प्रकल्पांकडे भाजपने दुर्लक्ष केले. राजकारण बाजूला ठेवले असते तर प्रकल्पांची वाताहत झाली नसती.

स्मार्टसिटीच्या यशस्वी प्रकल्पांमध्ये मनसेच्या सत्ताकाळातील प्रकल्प दाखविणे चालते, परंतु प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते ही बाब चुकीची आहे. मनसेच्या कामावर भाजपकडून पोळी भाजली जात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तातडीने न बुजविल्यास अभियंत्यांना त्याच खड्ड्यांमध्ये बसविण्याचा इशारा दिला. कोरोनाकाळात काम केलेल्या मानधनावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली.

आज हात जोडतो, उद्या मोकळे सोडू...
मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कालिदास कलामंदिरातील व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार करताना कला व नाट्यक्षेत्रावर कोरोनामुळे संकट आले असताना नाशिकमध्ये नाट्यसंस्थांना त्रास दिला जातो. दीड वर्षापासून असलेली अनामत रक्कम परत केली नाही. कालिदासच्या व्यवस्थापकांनी वर्तणूक सुधारली नाही तर मनसेस्टाइलने सुधार करावी लागेल, असे सांगताना आज हात जोडले, उद्या हेच मोकळे सोडू, असा इशारा दिला.
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in