उद्धव ठाकरेंनी नाशिक-पुणेसाठी सुचवली `ही` रेल्वे

पुणे-नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २३४ किलोमीटरचा हा मार्ग असून, १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने २४ रेल्वेस्थानके मिळून हा मार्ग तयार केला जाणार आहे.
Uddhav Thakre
Uddhav Thakre

नाशिक : पुणे-नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २३४ किलोमीटरचा हा मार्ग असून, १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने २४ रेल्वेस्थानके मिळून हा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून, उद्योग-व्यवसाय रोजगार शिक्षण आणि दळणवळण याला हातभार लागणार आहे.

महा रेल ही रेल्वे विभाग व राज्य शासनाची एकत्र काम करणारी कंपनी आहे. ही कंपनी या प्रकल्पाची उभारणी जलदगतीने करणार आहे. पुणे, हडपसर, मांजरी, कोळवडी, वाघोली, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, शिंदे आणि नाशिक रोड यांसारखी महत्त्वाची स्थानके या रेल्वेमार्गात येणार आहेत. या रेल्वे प्रकल्पाचा खर्च १६ हजार कोटींचा आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंत्रिमंडळात लवकर आणून संमत करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे एका बैठकीत श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार यांनी चर्चेत भाग घेतला.

कनेक्टिव्हिटीला चालना
पुण्याला जाण्यासाठी सध्या सहा तास खर्च होतात. त्यात वाहतुकीचा अडथळा, खड्डे, रस्त्यांच्या अडचणींबरोबरच वेळखाऊ प्रवास होत असतो. त्यामुळे ही रेल्वे सुरू झाल्यावर कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून किमान दोन तासांत रेल्वेने पुणे गाठणे शक्‍य होणार आहे. नाशिकचे अनेक उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार पुण्याशी निगडित असल्यामुळे नाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी सोयीची असणार आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com