पीठ अन् मीठ घेऊन हे शेतकरी `या`साठी निघालेत मुंबईला !

दिल्लीत आंदोलन करणा-या पंजाबच्या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये हजारो शेतकरी जमले. गाठीशी पीठ, मीठ, मिरची असा शीधा घेऊन आज हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना झाले.
Ashok Dhavle
Ashok Dhavle

नाशिक : दिल्लीत आंदोलन करणा-या पंजाबच्या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये हजारो शेतकरी जमले. गाठीशी पीठ, मीठ, मिरची असा शीधा घेऊन आज हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना झाले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी निघालेला हा जत्था सोमवारी आझाद मैदानावर जमून सरकार विरोधात एल्गार करणार आहे. त्यानंतर ते राजभवनवर जाऊऩ निवेदन देतील.   

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय डॅा अशोक ढवळे म्हणाले, केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. मूठभर कॉर्पोरेटस्ना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा घाट घातला जातोय. यास विरोध करण्यासाठी गेल्या ५८ दिवसांपासून देशातील पाचशे शेतकरी संघटना एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लढा देत आहे.  दिल्लीतील हा लढा मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा 'नाशिक ते मुंबई वाहन मार्च' आज सायंकाळी मुंबईकडे रवाना झाला.

"लढू अन् सरकारला कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू' या जिद्दीने या मोर्चात राज्याच्या विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवले. शेतकरी न्यायहक्कांसाठी लढा देत असताना सरकार मनमानी करत आहेत. त्यामुळे आता सरकारला जाग आणण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा सोमवार  पर्यंत चालणार आहे. 

हा वाहन मोर्चा निघण्यापूर्वी गोल्फ क्लब मैदानावर सभा झाली. दुपारनंतर वाहन मोर्चाने राजधानी मुंबईकडे कूच केली. राज्यभरातून हजारो आंदोलक  सकाळी ११ वाजेपासून वाहनांमधून गोल्फ क्लब मैदानावर जमा झाले होते. मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. नाशिकवरून निघालेला वाहन मार्च २४ तारखेला आझाद मैदानावर सायंकाळी पोहचून महामुक्काम मोर्चा होईल. त्यांनंतर २५ तारखेपासून मोर्चा राजभवनावर निघून २६ जानेवारीपर्यंत चालेल. तीन कृषी विरोधी व चार कामगार विरोधी कायदे,प्रस्तावित वीज बिल मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये ५० हजाराहून अधिक आंदोलक सहभागी होतील व लढा व्यापक करतील. जर सरकारने याची दखल घेतली नाही. तर संपूर्ण राज्यभरात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्यात येईल,अशी माहिती डॉ.ढवळे यांनी दिली. 

यावेळी डॉ. ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल. कराड, राज्य सचिव डॅा अजित नवले, सुनील मालुसरे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या मरीयम ढवळे, `डीवायएफ`च्या नेत्या प्रीती शेखर आदी उपस्थित होते. 
भोजनासाठी सोबत शिधा...

सलग तीन दिवस आंदोलक मुंबईत जमणार आहेत. शेतकरी, कामगार आंदोलकांनी सोबत शिधा आणला आहे. मात्र गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक संस्था, सिटू प्रणित कामगार संघटना मदत जमा करून भोजन व्यवस्था करणार आहेत अशी माहिती डॉ.डी. एल. कराड यांनी दिली.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com