`त्यांनी` चक्क पाच लाखांच्या नोटा कचऱ्यात फेकल्या!

चलार्थपत्र मुद्रणालयातून चोरीस गेलेल्या पाच लाखांच्या नोटांचा तपास लावण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. हे पाच लाख रुपये चोरीस गेलेले नसून, कटपॅक सेक्शनमधील दोन सुपरवायझरकडून कामाच्या व्यापात रिजेक्ट नोटा समजून त्यांचे पंचिग झाल्याचे स्पष्ट झाले. पंचीग नंतर या नोटा नष्ट करावयाच्या कचऱ्यात टाकण्यात आल्या.
Notes
Notes

नाशिक  : चलार्थपत्र मुद्रणालयातून चोरीस गेलेल्या पाच लाखांच्या नोटांचा तपास लावण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. (Police unfold the 5 lacs notes theft of Currancynote press) हे पाच लाख रुपये चोरीस गेलेले नसून, कटपॅक सेक्शनमधील दोन सुपरवायझरकडून कामाच्या व्यापात रिजेक्ट नोटा समजून त्यांचे पंचिग झाल्याचे स्पष्ट झाले. ( These notes have been throw in rejected notes box  wrongly due to work pressure) पंचीग नंतर या नोटा नष्ट करावयाच्या कचऱ्यात टाकण्यात आल्या. नष्ट केलेल्या नोटांच्या तपशीलाची छाननी केल्यावर हे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान या दोन्ही सुपरवायझर यांनी त्याचा खुलासा केला. दोघांनी मुद्रणालय व्यवस्थापनाला दिलेल्या पत्राद्वारे आपली चुक मान्य केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या फेब्रुवारीत नोटांचे बंडल चोरीस गेल्याची तक्रार मुद्रणालय व्यवस्थापनाने १३ जुलैला दाखल केली होती. मुद्रणालयाने सहा महिने अंतर्गत तपास करूनही तपास लागला नव्हता. पोलिसांनी संबंधित विभागातील अधिकारी व कामगारांकडे चौकशी करूनही सुरवातीला काहीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर नोटा छपाईची सर्व प्रक्रिया जाणून घेत, हा बंडल सर्वांत शेवटी कोणाच्या निदर्शनास आला, याची माहिती घेतली. कटपॅक सेक्शन व पॅकिंग सेक्शनचे रेकार्ड तपासले. त्यात, हे बंडल १२ फेब्रुवारीला तपासणीसाकडून तपासला गेल्याचे दिसले. परंतु, त्याबाबत निश्‍चितता होत नसल्याने पार्सल फोडून तपासणी केली असता, त्या ठिकाणी दुसराच बंडल तपासल्याचे दिसून आले. सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंडल बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यानंतर पोलिसांनी कामगारांना विश्‍वासात घेतले. तरीही ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर, रेकार्ड तपासले असता कटपॅकच्या दोन सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला. 

त्यांनी माहिती देण्यासाठी वेळ मागितला. अखेर, कारवाईच्या भितीने शनिवारी (ता. २४) त्यांनी स्वतःहून व्यवस्थापनाला कबुली जबाब दिला. त्यानुसार हा नोटांचा बंडल चोरीस गेलेला नसून, कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला व व्यवस्थापन कारवाई करेल या भितीने ही गोष्ट कोणास सांगितली नसल्याचे पत्र व्यवस्थापनाला दिले आहे. दरम्यान, संबंधीत दोन्ही सुपरवायझरना निलंबीत करण्यात आले असून, वरिष्ठ व्यवस्थापकांना याबाबत माहिती होती काय, याचा तपास आता सुरु आहे. पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, उपायुक्त विजय खरात, सहआयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्री. शिंदे, कुंदन जाधव, सहाय्यक निरीक्षक संतोष खडके, अजिनाथ बटुळे, सुधीर आव्हाड, सुदर्शन बोडके, रतनसिंग नागलोथ यांनी तपास केला.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com