एसपी पंडीत म्हणाले, आरोपींना ताबडतोब न पकडल्यास राजीनामा देईन!

दराणे (ता. शिंदखेडा) येथील प्रेमसिंह राजेंद्रसिंह गिरासे (वय 20) याला चोरांनी तीक्ष्ण हत्यारांने हल्ला करून ठार केले. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. तेव्हा जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी `गुन्हेगाराला तातडीने पकडून कठोर कारवाई केली जाईल. तसे न घडल्यास पदाचा राजीनामा देईन` असे आव्हान दिले.
Chinmay Pandit
Chinmay Pandit

धुळे : दराणे (ता. शिंदखेडा) येथील प्रेमसिंह राजेंद्रसिंह गिरासे (Premsingh Girase) (वय 20)  याला चोरांनी तीक्ष्ण हत्यारांने हल्ला (he was dead due to sharp weapon Attack) करून ठार केले. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. (People make agitation) तेव्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित (SP Chinmay Pandit) यांनी गुन्हेगाराला तातडीने पकडून कठोर कारवाई केली जाईल. तसे न घडल्यास पदाचा राजीनामा देईन` (If Accused not arrest soon i will resigne from the post) असे आव्हान दिले. 

पोलिस अधिक्षकांच्या या धाडसी विधानाचे नागरिकांनी कौतुक केले. पोलिसांच्या या भूमिकेवर टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद देत रास्ता रोको मागे घेतला.   जखमी तरुणाचा धुळे येथे उफचारासाठी नेताना सोनगीर उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. राञी उशीरा खलाणे (ता. शिंदखेडा) येथील  संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दराणे येथील प्रेमसिंह गिरासे हा शिंदखेडा येथे नवीन मोटारसायकल घेण्यासाठी दोन मित्रांसह गेला होता.  सोमवारी दुपारी मोटारसायकल  घेवून परतत होता. त्यांची  जुनी मोटारसायकल मित्राना देवून दराणे येथे घरी जाताना नवीन मोटारसायकल सावकाश चालवायला सांगितली असल्याने मित्र काही अंतरा पुढे चालत होते. गावा जवळ असताना चिमठाणे महावितरण कंपनीच्या उपकेंद्रा जवळ अज्ञात हल्लेखोरांनी  याच्यावर तिक्षण हत्याराने वार केले. नवी मोटरसायक व मोबाईल घेवून पळ काढला. 
या वेळी गंभीर जखमी प्रेमसिंग हा रस्त्यात पडून होता.  पण त्याला  मदतीसाठी कोणीही थांबत नसल्याने त्याने बांधकाम ठेकेदाराला मदतीसाठी हाक मारली.  ते आल्यावर जखमी अवस्थेत त्याला  चिमठाणे आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथे त्यांना धुळे येथे नेण्यास सांगितले. मात्र रुग्णवाहिका असूनही चालक नसल्यामुळे  त्याला वेळेवर रुग्णालयात पोहचवता आले नाही. खासगी मालवाहू वाहनाने त्याला पुढील उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. 

ग्रामस्थांचा चक्काजाम
दराणे येथील तरूणाचा खून झाल्याने ग्रामस्थांनी सोनगीर- दोंडाईचा रस्त्यावर दीड ते दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी ग्रामस्थांना अवाहन केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी घटनास्थळी रसर्व माहिती घेतली. या संशयीतांचे वर्ण मिळाले असून त्यांना अटक करण्यासाठी सहा पथके तयार केली आहे. त्यांच्यावर मोकासह अन्य कठोर कारवाई केली जाईल. आरोपींना तातडीने अटक न केल्यास आपण नोगरीचा राजीनामा देऊ असे सांगत त्यांनी तपासाचे आव्हान स्विकारले होते. 
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com