आशिष शेलार म्हणाले, सरकारमधील वसुलीबाज वाझे शोधा 

महाविकास आघाडी सरकारमधील वसुलीबाज वाझे शोधावेत, असे आव्हान भाजपचे माजी शिक्षणमंत्री व मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिले. त्यांनी नेहेमीप्रमाणे राज्य सरकारवर टीका केली.
Ashish Shelar
Ashish Shelar


धुळे : महाविकास आघाडी सरकारमधील वसुलीबाज वाझे शोधावेत, (search recover master like Police inspector Vaze in Government) असे आव्हान भाजपचे माजी शिक्षणमंत्री व मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिले. त्यांनी नेहेमीप्रमाणे राज्य सरकारवर टीका (He criticise state government) केली.

श्री. शेलार म्हणाले, की महाआघाडी सरकारची जनविरोधी धोरणे आणि भाजपच्या संघटनासाठी राज्य दौऱ्यावर आहे. राज्य सरकार केवळ खाण्यात गुंग असून सर्व व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. पोलिस यंत्रणेचे खच्चीकरण केले जात असून अधिकारी बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार घडत आहेत. कायदा-सुव्यवस्थाही ठीकठाक नाही. राज्यात तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी, अशी स्थिती दिसते. 

सरकारची प्रशासनावर पकड राहिलेली नाही. नेतृत्वात समन्वयाचा अभाव दिसतो. मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आणणारे हे सरकार आहे. आदिवासींच्या खावटीतही गैरप्रकार झाला आहे.

मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या विरोधात भाजपही आंदोलन छेडेल. मुंबई विमानतळ अदानींना देण्याचा ठराव महाआघाडी सरकारने केला आहे. यावरून विरोधकांचे बाहेर आंदोलन आणि आत हस्तांदोलन, अशी नीती आहे. केंद्रीय कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे श्री. शेलार यांनी सांगितले.  

यावेळी भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, उपमहापौर भगवान गवळी, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव आदी उपस्थित होते.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com