मी घोषणा करेपर्यंत राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चेला अर्थ नाही; रक्षा खडसे यांचे स्पष्टीकरण

नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतेवेळी माझ्याशी चर्चा केली होती, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.
Raksha Khadse clarified his position on joining NCP
Raksha Khadse clarified his position on joining NCP

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला असला तरी रक्षा खडसे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Raksha Khadse clarified his position on joining NCP)

जो पर्यत मी स्वतःहून अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत माझ्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चेला काही एक अर्थ नाही, असे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. मीडिया परस्पर काहीही सांगते. मी भाजपाची सदस्या असून रावेर लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून काम करत राहणार आहे. भविष्यात देखील भाजपची सदस्या म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

रक्षा खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर आपण रक्षा खडसेंनाच विचारा, असे उत्तर त्यांनी दिलं होतं. याबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेला काही अर्थ नसल्याचे सांगितले. त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाला आजतरी पूर्णविराम दिला आहे.

नाथाभाऊ आजही मला मदत करतात

रक्षा खडसे यांनी सांगितले की, मला राजकारणात बाबांनी (नाथाभाऊ) यांनी आणले. त्यांनी मला राजकारण शिकवले आहे. तुझे काम म्हणजे तुझे भविष्य आहे म्हणून मी तसे काम करत आहे. नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतेवेळी माझ्याशी चर्चा केली होती. मला त्यांनी भाजप मध्येच काम करण्यासाठी सांगितले आहे. कोणत्याही प्रकारची मला राष्ट्रवादी येण्यासाठी त्याची जबरदस्ती नाही. आम्ही परिवार म्हणून एकत्र राहत असलो तरी जेव्हापासून दोघांचे पक्ष बदलले तेव्हापासून आम्ही दोघेही पक्षवाढीसाठी काम करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

मला दहा वर्षे राजकारणात नाथाभाऊ यांनी खूप काही शिकवले आहे. त्या शिक्षणाच्या जोरावर मला कुठेही अडचण आली तरी आजही नाथाभाऊ मला मदत करतात. नाथाभाऊंचे भाजप मध्ये असताना देखील सर्वपक्षीय नेत्यांशी आपुलकीचे संबंध राहिले आहेत. त्यांच्याशी बांधील असलेला कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याचे ते काम करतात. अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. ते तोडता येत नाहीत. आज देशात अनेक उदाहरण आहेत की, एकाच घरात दोन-तीन पक्ष आहेत. त्यामुळे आम्ही एकाच घरात खडसे परिवार राहत असलो तरी काम करताना काहीच अडचण येत नाही, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com