राज ठाकरे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे पत्ते पिसणार!

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे पाठापोठ नाशिककडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी आज शहरातील विभाग अध्यक्षांची बैठक घेतली.
Raj Thakre
Raj Thakre

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या हापालिका निवडणुकीच्या (Prepration of NMC election in next year) तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे पाठापोठ (Part of it Raj Thakre focused on Nashik after Pune) नाशिककडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी आज शहरातील विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. (Today he took a meeting of Nashik Office bearers) निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या २२ ऑगष्टला ते शहरातील नव्या शाखा अध्यक्षांची नावे जाहीर करतील. 

यावेळी त्यांनी या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रश्नावर आपल्याशी थेट संपर्क करावा. पदाधिकायांना थेट संवाद साधण्यासाठी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक देत विभाग अध्यक्ष व पक्षाध्यक्ष याच्यातील संपर्काचा स्तर मोडीत काढला. 

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपुर्वी पुणे शहराचा दौरा करून मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यापाठोपाठ सोमवारी अचानक पदाधिकायांना कृष्णकुंजवर बोलाविण्याचे निरोप आले. आज सकाळी दहा वाजता जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच सहाही विभाग अध्यक्षांसोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी व शाखा अध्यक्षांच्या नेमणूकी संदर्भात चर्चा केली. शहरातील सहा विभाग अध्यक्षांशी वन टू वन चर्चा केली. 

त्याचवेळी विभाग अध्यक्षांना स्वतःचा व्यक्तिगत भ्रमणध्वनी क्रमांक देताना थेट संपर्क साधण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर अन्य पदाधिकारी व विभाग अध्यक्षांशी संयुक्त बैठक घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या. यावेळी युवा नेते अमित ठाकरे, जेष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदिप देशपांडे, अविनाश जाधव व योगेश परूळेकर तसेच नाशिक मधून जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकूश पवार, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, नितीन साळवे, विक्रम कदम व योगेश लभडे आदी उपस्थित होते. 

ऑगष्टमध्ये नाशिकचा दौरा 
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा संघटना बांधणीसाठी नाशिकला येत आहे. त्यांनी स्वताहून प्रोग्राम दिला. २१ ते २३ सप्टेंबर असा दौरा राहील. २१ सप्टेंबरला अमित ठाकरे व पक्षाचे प्रमुख नेते दौऱ्याची तयारी करण्यासाठी येतील. २२ सप्टेंबरला नवीन शाखा अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर होतील. २३ सप्टेंबरला सहाही विभागाचे विभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्षांचा एकत्रित मेळावा होईल, अशी माहिती पक्ष कार्यालयातून देण्यात आली. 


संघटनेत बदलाचे संकेत 
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनेत शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या करताना वरिष्ठ पातळीवर देखील बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला निवडणुकीत सामोरे जाताना आक्रमक चेहरा शोधला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विभाग अध्यक्षांना थेट भ्रमणध्वनी क्रमांक देताना राज ठाकरे यांनी संपर्काचे स्तर मोडीत काढले आहेत. मनसेच्या अपयशाला वरिष्ठ नेते कारणीभुत असल्याचे मत झाले आहे. शाखा प्रमुख, विभाग अध्यक्ष किंवा स्थानिक पातळीवर नेत्यांना राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधताना वरिष्ठ नेत्यांच्या नाकदुया काढाव्या लागायच्या यापुर्वी शहराध्यक्षपदी ॲड. राहुल ढिकले असताना फारशी अडचण नव्हती. परंतू कार्यकर्ते कमी व नेते अधिक झाल्यानंतर संपर्क तुटला होता. त्यातून थेट संपर्काचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. 
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com