खासगी लॅबला कोरोना चाचणीची परवानगी द्या : गिरीश महाजन 

कोरोना' संशयित रुग्णाचा "स्वॅब' अहवाल तातडीने मिळण्यासाठी खासगी लॅबला कोरोना चाचणीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
Private Lab give the permission for corona testing
Private Lab give the permission for corona testing

जळगाव : "कोरोना' संशयित रुग्णाचा "स्वॅब' अहवाल येण्यास तब्बल सहा ते सात दिवस लागतात. या काळात संबंधित व्यक्ती अनेकांना भेटते, त्या व्यक्तीचा अहवाल कोरोना "पॉझिटीव्ह' आल्यास रुग्णसंख्येत वाढ होते. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्यासाठी खासगी लॅबला कोरोना चाचणीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाचा संसर्ग जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात वाढत आहे. जळगाव जिल्हा तर "हॉटस्पॉट' होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत चिंता व्यक्त करून ते म्हणाले, की सरकारतर्फे कोरोना संशियतांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संशयितांचा "स्वॅब' घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येण्यास सात ते आठ दिवस लागतात. या काळात संशयित रुग्ण सर्वत्र फिरत असतो, तो अनेकांना भेटत असतो. त्याचा अहवाल "पॉझिटीव्ह'आल्यानंतर मात्र मग प्रशासनासह सर्वांचीच धावपळ सुरू होते. या काळात तो ज्यांना ज्यांना भेटला, त्या सर्वांना क्वॉरंटाइन केले जाते. केवळ अहवाल विलंबामुळेच हे होत आहे.

आज सरकारच्या सर्वच लॅबवर तपासणीची गर्दी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अहवालही ताबडतोब मिळू शकत नाही. त्यामुळे सरकारने खासगी लॅबला चाचणीसाठी तातडीने परवानगी देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या लॅब सवलतीच्या दरात तपासणी करून देण्यास तयार आहे. खासगी लॅबला परवानगी दिल्यास शासकीय लॅबवर असलेला "लोड' कमी होईल. शिवाय अगदी एका दिवसात अहवाल प्राप्त होऊन रुग्णांवर उपचारही सुरू होतील. शिवाय हा रुग्ण अधिक जणांना भेटणार नाही, त्यामुळे इतर रूग्ण संख्याही कमी होईल. 'पॉझिटीव्ह' रुग्णावर उपचार सुरू होवून तो लवकर बरा होईल. 

मुख्यमंत्र्यांना पत्र 

जिल्ह्यासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी करून तातडीने उपाय होण्यासाठी खासगी लॅबला तपासणीची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांना केली आहे. मात्र, त्याबाबत त्यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. जर त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला तर राज्यात ही रुग्णसंख्या आटोक्‍यात येईल, असा विश्‍वास आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com