महाराष्ट्र कोरोनामुक्त हवा तर पोलिसांनी सक्ती करावीच! - Police should be serious against Covid19 & Mask. maharashtra politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

महाराष्ट्र कोरोनामुक्त हवा तर पोलिसांनी सक्ती करावीच!

संपत देवगिरे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

गतवर्षी कोरोना काय असतो, याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे. दुसरी लाट निश्चितच परवडणारी, सामान्यांना झेपणारी नाही. तरीही मोठा वर्ग अद्याप उदासीन आहे. अगदी डॅाक्टरांनाही मास्क नसल्याने दंड करावा लागला. ही उदासीनता सगळ्यांच्या मुळावर येईल.

नाशिक : गतवर्षी कोरोना काय असतो, याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे. दुसरी लाट निश्चितच परवडणारी, सामान्यांना झेपणारी नाही. तरीही मोठा वर्ग अद्याप उदासीन आहे. अगदी डॅाक्टरांनाही मास्क नसल्याने दंड करावा लागला. ही उदासीनता सगळ्यांच्या मुळावर येईल.

त्यामुळे पोलिस, अन्य यंत्रणा मास्क व सोशल डिस्टन्सींगच्या सक्तीसाठी मैदानात उतरली पाहिजे. त्यातच राज्याचे व्यापक हित आहे. 

कोविड 19 विषाणूने 2020 ची आर्थिक व्यवस्था जवळ जनळ नेस्तनाबूत केली. त्याची झळ मजुराला बसली तशी हुजारांनाही बसली. कामगाराला बसली तशी मालकालाही बसली. या सर्वांना झळ बसल्याने शासनालाही सोसावे लागले. त्याचे परिणाम अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे रविवारी थेट मुख्यमंत्र्यांना जनतेला संबोधन  करावे लागले. असे असले तरीही समाजातील एक वर्ग अद्याप उदासीन आहे. तो मास्क वापरत नाही. शारीरीक अंतर पाळत नाही. त्यात शिक्षीत, अशिक्षीत सगळेच आहेत. काल बाजारपेठे एका महिलेने शालीमार भागात एका अल्पसंख्याक विक्रेत्याला विचारले तुम्ही मास्क का वापरत नाही?. तो म्हणाला, कोरोना वगैरे काहीही नाही. ही केवळ अफवा आहे. कोरोना आहे, काळजी घ्या, असे सांगीतल्यावर तो म्हणाला, तसे असेल तर लग्नाला हजारो लोक कसे जमतात ?. मिरवणूक शेकडो लोक तासन् तास नाचतात, ते कोणीच मास्क कसे वापकत नाही?. याचे उत्तर काय देणार?. कारण ते वास्तव आहे. यावर काय उत्तर असेल.

कोरोनाचा धोका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधोरेखीत केला आहे. वरिल प्रसंग त्याची दुसरी बाजू आहे. त्यामुळे काही दिवस तरी पोलिस, होमगार्ड, वाहतूक पोलिस, शासकीय यंत्रणा, महापालिका यांनी सर्व कामे बाजुला ठेऊन विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविणारे यांच्यावर लक्ष केंद्रीत करावे. सरसकट हजार रुपये दंड वसुल करावा. सक्ती हाच पर्याय असेल तर ते करावे. त्याने लोकांच्या खीशाला झळ बसेल. पोलिस व शासनाला महतूल मिळेल. कारण हजार रुपये दंडातील निम्मी रक्कम पोलिसांना तर निम्मी रक्कम महसूल शाखेला मिळणार आहे. त्यात प्रशासनाला महसूल व बेशीस्तांना तोशीष व समाजाचे हित आहे. त्यामुळे काही दिवस पोलिसांनी मास्क न वापरणे हा गंभीर गुन्हा आहे, हे गृहीत धरुनच दंडुका हाती घ्यावा. 

हा फक्त नाशिकचा नव्हे तर राज्यातील प्रत्येक महानगराचा गंभीर प्रश्न आहे. एकीकडे शहरांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे बाजारपेठेत कोरोनाच्या सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसते. कारवाईकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त या तीन यंत्रणांनी एकत्र येऊन ही मोहिम हाती घ्यावी. तसे केले तर कोरोना संकटाच्या लढ्यात फत्ते निश्चित आहे.  

गर्दीची सर्वच ठिकाणे विशेषत: बाजारपेठेतील गर्दी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. असे असताना नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारतर्फे सोशल डिस्टन्स राखणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, अशा सर्वच नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. ग्राहकांव्यतिरिक्त कारण नसताना फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात सर्वच बाजारपेठांत नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली. महापालिका आणि पोलिसांकडून त्यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. 

दरम्यान, लॉन्स, मंगल कार्यालयांसह गर्दी होणाऱ्या ठिकाणीची पाहणी करत कोरोना नियमाचे उल्लंघन होत असेल, तर त्यांच्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचेही सुनील शिरसाठ यांनी सांगितले.
 

डॉक्टरांना पाच हजारांचा दंड
महापालिकेच्या पूर्व विभागाच्या आरोग्य पथकाने सोशल डिस्टन्सचे पालन करणाऱ्या डॉक्टरास पोलिसांच्या उपस्थितीत पाच हजारांचा दंड केला. महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांतील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ यांनी दिली. इंदिरानगरमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नेहा देशमुख यांच्या क्लिनिकमध्ये असाच प्रकार पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आला.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख