उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात याचिका - Petition file against Dy CM Ajit Pawar; State Politics | Politics Marathi News - Sarkarnama

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात याचिका

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रातील आरोपांवर ही याचिका आहे.
 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. (Petition file against Dy CM Ajit Pawar in Mumbai HC) निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रातील आरोपांवर ही याचिका (petition based on controversial Police officer Sachin Waze`s letter) आहे.

श्री वाझे सध्या पोलिस कोठडीत आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टिलिया निवासस्थानासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याने लिहिलेल्या पत्रात गुटखा व्यापारी दर्शन घोडावत यांच्याकडून शंभर कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे. घोडावत हे पवार यांचे निकटवर्तीय आहेत, असा उल्लेख या पत्रात आहे. त्यामुळे पवार यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. वकील रत्नाकर डावरे यांनी ही याचिका केली आहे.

वाझेने रिमांड दरम्यानच्या सुनावणीत हे पत्र विशेष न्यायालयात दिले होते. मात्र, विशेष न्यायाधीशांनी पत्र दाखल करून घेण्यासाठी नकार दिला होता. नियमित कायदेशीर प्रक्रियेनुसार बाजू मांडावी, अशी सूचना न्यायालयाने केली होती. या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे पवार आणि परब यांच्या चौकशीची मागणी याचिकादाराने केली आहे. लवकरच नियमित न्यायालयात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
...

हेही वाचा...

शिवसेनेची `शिवसंपर्क` अभियानातून निवडणुकीची तयारी
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख